कºहाड : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी कºहाड येथील सारंग श्रीनिवास पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी आज, रविवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी कºहाड येथे फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला. पदवीधर मतदारसंघासाठी सारंग पाटील यांच्यासह कºहाड येथीलच जनता बँकेचे अध्यक्ष राजेश पाटीलही इच्छुक होते. या दोन्ही उमेदवारांनी अनेक महिन्यांपासून राष्टÑवादीची उमेदवारी मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत राजेश पाटील यांनीच राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना भाजप उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळीही राजेश पाटील उमेदवारीसाठी इच्छुक होते. काल, शनिवारीच राजेश पाटील यांच्या निवासस्थानी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्यास बंडखोरी करण्याचा इशारा दिला होता. सारंग पाटील हे सिक्कीमचे राज्यपाल व कºहाडचे माजी खासदार श्रीनिवास पाटील यांचे पुत्र आहेत. त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण पुणे येथे पूर्ण केल्यानंतर अभियांत्रिकीची पदवी पुणे विद्यापीठातून मिळविली आहे. फायनान्समधील व्यवस्थापन पदवी मिळविल्यानंतर त्यांनी केंद्र शासनाच्या ‘सी डॅक’ संगणक संशोधन संस्थेत काम केले आहे. सध्या ते कºहाड येथील सनबिम संगणक संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम करतात. एनएसयूआय, विद्यापीठ प्रतिनिधी, सातारा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे. (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी माझ्यावर सोपविलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. माझे सहकारी अरुण लाड, शरद बुट्टे-पाटील, राजेश पाटील, शैला गोडसे यांनी माझ्याबरोबर मतदार नोंदणी मोहिमेमध्ये महत्त्वाची कामगिरी केली आहे. - सारंग पाटील
'पदवीधर'साठी राष्टÑवादीतर्फे सारंग पाटील
By admin | Updated: May 26, 2014 01:19 IST