शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले भूषणगडावर राबविली स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 22:25 IST

आजच्या मोहिमेचे मूळ उद्दिष्ट असे की, येत्या नवरात्रोत्सवाआधी गडावर प्लास्टिक कचरा होऊ नये म्हणून भूषणगडावरील हरणाईदेवी मंदिर परिसर आणि गडावरील इतर परिसरात मार्गदर्शक फलक लावणे, गड स्वच्छता आणि गडावरील दगडी बांधीव विहिरीला प्लास्टिक मुक्त ठेवण्यासाठी त्यावर आच्छादन घालणे असे होते

ठळक मुद्दे क-हाड, म्हासुर्णे, पळशी, रहिमतपूर येथून मावळ्यांची हजेरी शिवसंकल्प परिवाराकडून गडकोटांचे संवर्धन

पुसेसावळी : ‘मनी धरुनी दृढ भाव। केला तो अट्टाहास शिवसंकल्पाचा।’ असा ध्यास मनात धरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांचे संवर्धन करण्यास लाखो मावळे आजच्या घडीला बऱ्याच किल्ल्यांवर कार्य करीत असतात. या गडकोट किल्ल्यांचे संवर्धन, संरक्षण आणि त्यांची काळजी घेतली जाते. अशाच गडकोट किल्ल्यांचा स्वच्छतेचा ध्यास मनी धरून किल्ले भूषणगड येथे गुरुवारी शिवसंकल्प परिवाराने मोहीम घेण्यात आली.

आजच्या मोहिमेचे मूळ उद्दिष्ट असे की, येत्या नवरात्रोत्सवाआधी गडावर प्लास्टिक कचरा होऊ नये म्हणून भूषणगडावरील हरणाईदेवी मंदिर परिसर आणि गडावरील इतर परिसरात मार्गदर्शक फलक लावणे, गड स्वच्छता आणि गडावरील दगडी बांधीव विहिरीला प्लास्टिक मुक्त ठेवण्यासाठी त्यावर आच्छादन घालणे असे होते.

गुरुवारी सकाळी ध्येयमंत्र आणि शिवगर्जनेने मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. सर्वात अदोगर गडावर असणाºया चौकोनी बांधीव दगडी विहिरीत प्लास्टिक कचरा जाऊन विहिरीत घाणीचे साम्राज्य होऊ नये म्हणून त्यावर आच्छादन घालण्याचे काम हाती घेतले.

या कार्यात त्या ऐतिहासिक वास्तूला कोणताही धक्का होऊ नये, अशा खबरदारीने विहिरीच्या चारी बाजूने तारेचे स्ट्रक्च र तयार करून त्यावर ग्रीन शेडनेटचे कापड बसविण्यात आले. जेणेकरून त्यात कोणताही कचरा जाणार नाही. त्यानंतर गडावरील सर्व परिसरात फिरून हाती लागेल तो सर्व प्लास्टिकचा कचरा गोळा करण्यात आला.

वीस मावळ्यांनी घेतला सहभाग..!

  • या मोहिमेस शिवसंकल्प परिवाराच्या २० मावळ्यांनी सहभाग घेतला होता. ज्यात कºहाड, म्हासुर्णे, पळशी, रहिमतपूर येथून मावळ्यांनी हजेरी लावली. या मोहिमेस हरणाईदेवी ट्रस्टच्या सदस्यांनी मोलाचे सहकार्य करून आजची मोहीम सुयोग्य पद्धतीने पार पाडण्यास मदत केली. अशा पद्धतीने शेवटी शिवघोष करून ही मोहीम सफलतेने पूर्ण केली.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFordफोर्ड