शहरं
Join us  
Trending Stories
1
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
2
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
3
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
4
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
5
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
6
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
7
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
8
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
9
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
10
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
11
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
12
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
13
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
14
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
15
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
16
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
17
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
18
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
19
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
20
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला

वाहन गेले की थरथरतो ‘सांगवी पूल’

By admin | Updated: December 29, 2014 23:41 IST

निरा नदी : फलटणकरांना प्रतीक्षा नव्याची...

फलटण : फलटण-बारामती रस्त्यावरील सांगवी येथील निरा नदीवरील वाहतुकीच्या पुलाची मोठी दुर्दशा झाली आहे. या पुलावरील वर्दळ पाहता हा पुल साक्षात मृत्यूचा सापळा बनला आहे. या पुलाशेजारी नवीन पुलाचे कामही रखडल्याने प्रवाशांच्यात भितीचे वातावरण आहे.फलटण ते बारामती हे २५ किलामिटर अंतर असून सध्या शिरवळ फलटण बारामती असा चौपदरीकरणाचे काम मंजुर करण्यात आले आहे. त्यामुळे पूर्ण रस्ता खाजगी ठेकेदाराकडे वर्ग करण्यात आला आहे. फलटण ते बारामती रस्त्यांवर अनेक ठिकाणी त्यांनी रस्त्याची, पुलांची कामे सुरू करून अर्धवट स्थितीत ठेवली आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी वळणे, खड्डे अपघातांना निमंत्रण मिळत आहे.फलटण ते बारामती रस्त्यावर सतत अपघातांची मालिका सुरू असून त्यामध्ये शेकडो जणांचा जीव रस्त्याच्या दुरावस्थेमुळे गेला आहे. अनेकांना अपघातामुळे अपंगत्वही आले आहे. अशीच परिस्थिती निरा नदीवर असलेल्या जुन्या व नव्या पुलांची झाली आहे. निरा नदीवर सांगवी येथे जुना पुल आहे. या पुलाला बाजुने कठडे व या कठड्यांना अपघात होवू नये म्हणून साखळदंड आहेत. या पुलावरून दररोज लहान, मोठे, अवजड अशी हजारो वाहनांची दिवसरात्र वर्दळ चालु असते. या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्यांचे साम्राज्य पसरले आहेच पण पुलावरील कट्टे तुटलेल्या स्थितीत आहेत. पुलाला कठडे नसल्याने जर अपघात होवून कोणी नदीत पडले तर त्याला वाचवणे अवघड होत आहे. रात्रीच्या वेळेस तर तुटलेल्या कठड्यामुळे हा पुल भयानक परिस्थितीत दिसतो. दहा बारा वर्षांपूर्वी एक वऱ्हाडाचा अख्खा ट्रक नदीत पडून अनेकांचा मृत्यू झाला होता. आजही या पुलावरून जाताना अनेकांना त्या अपघाताची आठवण होते. मात्र शासकीय यंत्रणा किंवा चौपदरीकरणाचे काम हाती घेतलेल्या ठेकेदारांनी या पुलाकडे तसेच रस्त्याच्या दुरावस्थेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. फलटण बारामती रस्ता चौपदरीकरणासाठी ठेकेदाराला हस्तांतरीत करण्यात आल्याने या रस्त्याच्या डागडुजीकडे आम्हाला लक्ष देता येत नसल्याचे शासकीय यंत्रणेचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)वाहनांच्या वर्दळीने थरथरतो रस्तानिरा नदीवरील या पुलाशेजारी नवीन पुलाचे काम चौपदरीकरणांतर्गत हाती घेण्यात आले. पण अर्धवट स्थितीत हा पूल सोडून दिल्याने या पुलाचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे जुन्या पुलावरूनच पूर्ण वाहतुक सुरू आहे. पुलावरील खड्डे व तुटलेले कट्टे यामुळे मोठ्या वाहनांच्या येण्या जाण्यामुळे पूल थरथरताना दिसतो. एखाद्या दिवशी धोकादायक स्थितीत असलेला पूल तुटल्यास याला कोण जबाबदार राहणार असा सवाल वाहनधारक उपस्थित करत आहेत.