शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
3
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
4
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
5
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
6
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
7
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
8
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
9
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
10
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
11
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
12
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
13
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
14
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
15
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
16
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
17
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
18
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
19
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
20
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?

सांगलीची मागणी तरीही माणमध्ये पाणी !

By admin | Updated: May 16, 2016 00:49 IST

किरकसाल येथे ग्रामस्थांनी केले जलपूजन : अरुण गोरेंचा विरोधकांना टोला

दहिवडी : ‘उरमोडी योजनेचे पाणी आ. जयकुमार गोरे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे किरकसालच्या बोगद्यातून पुन्हा एकदा माण तालुक्यात झेपावले आहे. ऐन दुष्काळात तीव्र पाणीटंचाई असताना हे पाणी आल्याने दिलासा मिळणार आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून आ. गोरेंनी वारंवार उरमोडीचे पाणी माण-खटावमध्ये आणूनही कोकलणाऱ्या बिनकामाच्या विरोधकांना आता पुन्हा एकदा चपराक बसली आहे,’ असा टोला माण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण गोरे यांनी लगावला. दरम्यान, यावेळी त्यांनी सांगली जिल्ह्याची मागणी असतानाही माण तालुक्यात पाणी आणल्याचे स्पष्ट केले. रविवारी उरमोडी योजनेचे पाणी किरकसाल बोगद्यातून माण तालुक्यात आल्यानंतर जलपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला किरकसाल येथील ग्रामस्थ उपस्थित होते. दुष्काळात माण तालुक्यात आलेले पाणी पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद दिसून येत होता. सर्वांनीच उरमोडीच्या या पाण्याचे उत्साहात पूजन केले. त्यानंतर बोराटवाडी येथे अरुण गोरे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना सभापती अरुण गोरे म्हणाले, ‘माण-खटावच्या मातीला लागलेला दुष्काळी कलंक कायमचा मिटवण्यासाठीच आ. जयकुमार गोरे यांनी सुरूवातीपासूनच प्रयत्न केले. उरमोडी योजनेसाठी आघाडीच्या कार्यकाळात कित्येक पट अधिक निधी आणून रखडलेली कामे मार्गी लावली. विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीत माणदेशी जनतेला दिलेल्या शब्दाप्रमाणे साडेतीन वर्षातच म्हणजे २०११-१२ मध्ये कण्हेर जोड कालव्याची कामे युद्धपातळीवर मार्गी लावून ऐन दुष्काळात सलग २७९ दिवस उरमोडीचे पाणी येरळवाडी तलावात सोडले होते. त्यानंतरच्या काळात पंपहाऊस एक व दोनची क्षमता वाढवून पाणी माण तालुक्यात आणण्यासाठी आमदार गोरेंनी जोरदार प्रयत्न केले होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका घेवून कॅनॉलचीही कामे पूर्ण केली. आमदारांच्या प्रयत्नांना यश येवून २४ आॅगस्ट २०१४ रोजी उरमोडीचे पाणी पहिल्यांदा माण तालुक्यात पोहचले होते. त्यावेळीही हजारोंच्या संख्येने माणदेशी जनता जलपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होती. त्याचबरोबर यावर्षीही १४ जानेवारीला पुन्हा एकदा उरमोडी योजनेचे पाणी जनतेच्या मागणीनुसार माणमध्ये आणले होते. दरम्यानच्या काळात कॅनॉल, पंपहाऊस, भूसंपादनाच्या कामासाठीही आमदार गोरेंनी विशेष प्रयत्न केले आहेत. प्रमाणिक आणि निरंतर प्रयत्नांमुळे उरमोडीचे पाणी माण तालुक्यात येत आहे. मात्र, पाण्यासाठी काहीच प्रयत्न न करणारे किंबहुना ज्यांना माण-खटावच्या मातीशी देणे घेणे नाही. असे रिकामटेकडे आणि पात्रता नसणारे विरोधक येणारे पाणी दिसत असूनही कायमच कोकलत आहेत, त्यांना आमदार जयकुमारे गोरेंच्या प्रयत्नांनी वेळोवेळी चपराकही दिलेली आहे, तरीही त्यांना याचा नेहमीच विसर पडत आलेला आहे. रविवारी आलेल्या उरमोडी योजनेच्या पाण्यामुळे दु्ष्काळातही येथील जनतेला दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद दिसू येत होता. यापुढेही माण-खटावच्या विकासासाठी आमदार गोरे यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत.‘ या पत्रकारपरिषदेस दादासाहेब काळे, सोमनाथ भोसले, दिगंबर राजगे, आप्पा बोराटे, बाळासाहेब पिसे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)