शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
3
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
4
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
5
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
7
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
9
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
10
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
11
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
12
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
13
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
14
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
15
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
16
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
17
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
18
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
19
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
20
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली

विरोधानंतरही संदीप कोठडीत

By admin | Updated: January 17, 2015 00:12 IST

खंडणी प्रकरण : रुग्णालयात उपचार घेताना वैद्यकीय रिपोर्ट ‘नॉर्मल’

सातारा : डॉक्टरचे अपहरण करून त्यांच्याकडे वीस लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेला जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे याचा आज, शुक्रवारी ताबा घेत त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली. तत्पूर्वी त्याने छातीत दुखत असल्याचे सांगून जिल्हा रुग्णालयातून ‘डिस्चार्ज’ घेण्यास नकार दिला होता; मात्र पोलिसांनी वैद्यकीय अहवालाचा आधार घेत त्याला ताब्यात घेतले आणि चौकशीसाठी पोलीस कोठडीत आणले. दरम्यान, या प्रकरणातील अन्य चार संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. सातारा तालुक्यातील काशीळ येथील डॉ. सिकंदर शेख यांना मारहाण करून त्यांच्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक, कला-क्रीडा, ग्रंथालय सेलचा प्रदेश उपाध्यक्ष तथा शाहूपुरी गटाचा जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे याच्यासह मल्लेश मुलगे याच्यावर खंडणी, अपहरण आणि दरोड्याचा गुन्हा दाखल झाला असून, दोघांनाही काल, गुरुवारी पहाटे त्यांना अटक झाली. या प्रकरणात अन्य चौघांचा सहभाग असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अटकेनंतर संदीप शिंदे आणि मल्लेश मुलगे या दोघांना न्यायालयाने मंगळवार (दि. २0) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. (पान ९ वर)वैद्यकीय चाचणीनंतर संदीप ‘फिट’शुक्रवारी सकाळी दोघांचीही रवानगी पोलीस कोठडीत होणार असल्याची कल्पना संदीप आणि मल्लेशला देण्यात आली. त्यानुसार दोघांनाही ‘डिस्चार्ज’ देण्यात आला. मात्र, संदीप पुन्हा एकदा छातीत दुखत असल्याचे सांगत झोपून राहिला. त्याने पोलीस कोठडीत जाण्यास नकार दिला. यावेळी संदीपचे काही कार्यकर्ते जिल्हा रुग्णालय आवारात जमले होते. त्यामुळे येथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, चाचण्यांनतर छातीत दुखत नसल्याचे समोर आले. (संबंधित वृत्त हॅलो १)