शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कांदा, लसूणची सफरचंदाच्या भावात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 11:19 IST

मागील काही दिवसांपासून सुरू असलेली कांद्यासह लसणाची दरवाढ काही केल्या थांबलेली नाही. कांद्याला प्रति किलो शंभर रुपये दर तर लसूण प्रति किलो दीडशे ते दोनशे रुपये किलो असल्याने कांद्याच्या या भावाने सफरचंदाच्या प्रति किलोच्या भावाची बरोबरी गाठली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आनंद झाला आहे. तर दुसरीकडे मात्र सर्वसामान्यांना मात्र हा कांदा व लसूण डोळ्यात पाणी आणू लागला आहे.

ठळक मुद्देकांदा, लसूणची सफरचंदाच्या भावात विक्रीगृहिणींचे बजेट कोलमडले : दरवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद

खटाव : मागील काही दिवसांपासून सुरू असलेली कांद्यासह लसणाची दरवाढ काही केल्या थांबलेली नाही. कांद्याला प्रति किलो शंभर रुपये दर तर लसूण प्रति किलो दीडशे ते दोनशे रुपये किलो असल्याने कांद्याच्या या भावाने सफरचंदाच्या प्रति किलोच्या भावाची बरोबरी गाठली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आनंद झाला आहे. तर दुसरीकडे मात्र सर्वसामान्यांना मात्र हा कांदा व लसूण डोळ्यात पाणी आणू लागला आहे.मागील वर्षी कांद्याची आवक तसेच उत्पादन वाढल्यामुळे घाऊक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या कांद्याचे भाव प्रति किलो १० रुपये असा मिळाला होता. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आले होते. यावर्षी मात्र कांद्याच्या उत्पादनातच घट झाल्यामुळे कांद्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे.

कांदा व लसणाचे सध्या बाजारातील दर कडाडले आहेत. त्यामुळे स्वयंपाकघरातील अत्यावश्यक असलेल्या या दोन घटकांमुळे गृहिणींना फोडणीला तडका देताना हात आखडता घेताना दमछाक होत आहे.तर गृहिणींचे महिन्याचे बजेट बिघडतानाचे चित्र दिसून येत आहे. सर्वसाधारण पाच ते दहा रुपये किलो दराने मिळणाऱ्या कांद्याने थेट शंभर रुपयांपर्यंत मजल मारली आहे. कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता कांदा व्यापारी व्यक्त करत आहेत. कोणतेही पदार्थ तयार करण्यात कांद्याला पहिले स्थान दिले जाते; परंतु कांद्याचे भाव वाढले आहेत. त्यामुळे आता कांदा भाव खाऊ लागला आहे.

तर रोजच्या जेवणातून तूर्त कांदा हद्दपार होताना दिसतो आहे. तर औषधी म्हणून पाहिले जाणारे लसूणदेखील आता भाव खाऊ लागल्याने फोडणीचा तडका देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या दोन महत्त्वाच्या घटकाचा दर गगनाला भिडला आहे. त्यामुळे सध्या महिला तसेच व्यावसायिक आपला हात आखडता घेताना दिसून येत आहेत. 

कांदा हा नाशवंत असल्याने त्याची साठवणूक करून ठेवता येत नाही. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्याचे शेतात झालेल्या नुकसानीमुळे पालेभाज्याचे तसेच कडधान्याचे दर वाढले आहेत. या वाढत्या दरामुळे03 महिलांचे स्वयंपाक घरातील आठवड्याचे तसेच महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. आवश्यक त्या पदार्थांमध्ये कांदा व लसूण हे लागतेच, त्यामुळे याला दुसरा पर्याय नसल्याने त्याचे प्रमाण कमी करावे लागत आहे.-शबाना काझी,गृहिणी खटाव

टॅग्स :onionकांदाSatara areaसातारा परिसर