शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

‘सखीज गॉट टॅलेंट’ स्पर्धा उत्साहात

By admin | Updated: May 7, 2016 00:51 IST

कलर्स व सखी मंच प्रस्तुत स्पर्धा : सखींनी लुटली बक्षिसांची मेजवानी

सातारा : डोलायला लावणारे नृत्याविष्कार, सुमधूर गाण्याचे बोल, व्हायोलिनची सुरावट, काटवट कण्याचा अविष्कार, अभिनयाची जुगलबंदी सोबत बक्षिसे आणि मनोरंजनाची लयलूट अशा उत्साही वातावरणात महिलांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. निमित्त होते कलर्स वाहिनी आणि लोकमत सखी मंच आयोजित सखीज गॉट टॅलेंटचे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सभागृह येथे गुरुवार, दि. ५ मे रोजी संध्याकाळी साडेचार वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कलर्स वाहिनीवर येत्या ३० एप्रिलपासून रात्री ९ वाजता दर शनिवार-रविवारी इंडियाज गॉट टॅलेंट हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. पुन्हा एकदा कलाकारांच्या अंगभूत कलेला प्रोत्साहन देण्यासाठी इंडियाज गॉट टॅलेंट हा मंच सच्च्या कलाकारांना उपलब्ध करून दिला आहे. ‘सिर्फ हुनर ही है पहचान’ या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री किरण खेर , दूरदृष्टी असलेले ख्यातनाम निर्देशक करण जोहर, नृत्यनिपूण मलाईका अरोरा, यांच्या अनुभवी परीक्षणातून सर्व कलाकार तावून सुलाखून बाहेर पडणार आहेत. यानिमित्ताने सखींसाठी यावेळी सखीज गॉट टॅलेंट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीला ‘लोकमत’चे संस्थापक, संपादक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या राष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षिका माया मोहिते, अमर अग्रवाल, अजित साळुंखे, अरविंद मोटे, सलमान सय्यद, विशाल इंगवले, सागर लोहार, ओमकार भंडारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. नृत्य, गायन व इतर कलागुण या तीन गटांत घेण्यात आलेल्या या स्पर्धेची रंगत व चुरस उत्तरोत्तर वाढतच गेली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून संतोष पाटील, वैशाली राजेघाटगे व सतीश आडेकर यांनी काम पाहिले. विजेत्यांना परीक्षकांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. उपस्थित सखींमधून सुशांता घाटगे या भाग्यवान सखीला पैठणी व सविता फाळके यांना सुवर्ण नथ देण्यात आली. वृषाली शिंदे-खैरमोडे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)कार्यक्रमाचे विशेष आकर्षण.. कार्यक्रमात कारी येथील मल्लखांब ग्रुपच्या खेळाडूंनी चित्तथरारक अशी योगासनांची व मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर केली. यामध्ये दोरीवरील मल्लखांब, जलदीप मल्लखांब, निराधार मल्लखांब असे नजर खिळवून टाकणारे प्रकार दाखविण्यात आले. ‘गंधतारा ढोल्स्’च्या ग्रुपमधील मुलींनी अप्रतिम असे ढोल वादन सादर केले. छावा ग्रुपने ही दांडपट्ट्याचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केले. तसेच कलाधाम ग्रुप आणि दुर्गेशनंदिनी यांनीही ग्रुप बहरदार असा ग्रुप डान्स सादर केला. सरगम पॅलेसचे अरविंद मोटे आणि त्यांच्या सहकलाकारांनी गायलेल्या गाण्यांना सखींनी दिलखुलास दाद दिली.