शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

हजारो मशालींनी उजळला किल्ले सज्जनगड, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष

By दीपक शिंदे | Updated: October 24, 2022 12:21 IST

पहाटेच्या प्रहरीच हजारो मशाली प्रज्वलित झाल्याने सज्जनगड किल्ला अक्षरशः प्रकाशमय झाला होता

दीपक शिंदेछत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेल्या किल्ले सज्जनगडावर दिवाळीची पहिली पहाट हजारो मशाली प्रज्वलित करून साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने किल्ले सज्जनगड नव्हे तर परळी पंचक्रोशी दुमदुमून निघाली होती. तसेच गडावरील दोन्ही महाद्वार बुरुजावर विद्युत रोषणाई व फुलांचे तोरण बांधण्यात आले होते. समाधी मंदिर, श्रीधरकुटी येथे फुलांची आरस करण्यात आली होती.पहाटेच्या प्रहरीच हजारो मशाली प्रज्वलित झाल्याने सज्जनगड किल्ला अक्षरशः प्रकाशमय झाला होता सज्जनगड दुर्गसंवर्धन समूहाच्यावतीने मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमतः पहाटे चार वाजता भातखळे (वाहनतळ) येथून फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची चांदीच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ढोल ताशांचा निनाद फुलांचा व रांगोळीचा सडा पायरी मार्गावर करण्यात आला होता.पालखीच्या पाठीमागे शेकडो मावळे मशाली घेऊन पायरी मार्गाने गडावर पोहोचले.गाईमुख, श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार, श्री समर्थ महाद्वार मार्गे पालखी अंगलाई मंदिराकडे आली यावेळी पारंपारिक आगीचे खेळ करण्यात आले यानंतर अंगलाई मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखी गडाच्या तटावरून धाब्याच्या मारुतीकडे नेण्यात आली. यावेळी संपूर्ण तट मशालीने प्रज्वलित झाला होता. यानंतर मुख्य समाधी मंदिरा मार्गे पेठेतील मारुती मंदिर श्रीधर कुटी मार्गे आंगलाई मंदिराकडे पालखी आणण्यात आली. पारंपारिक आगीचे खेळ झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी समाधी मंदिराकडे प्रस्थान झाली. यावेळी उपस्थित शिवभक्तांचा शिवरायांच्या जयजयकार सुरूच होता रामदास स्वामी संस्थांच्या प्रांगणात सहासी खेळ सादर करण्यात आली व ध्येय मंत्र म्हणण्यात आला यावेळी गडावरील संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध झाले होते

मशाल महोत्सवास परजिल्ह्यातूनही उपस्थितीसज्जनगडावरील मशाल उत्सव याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी कोल्हापूर सांगली पुणे यांसारख्या पर जिल्ह्यातूनही समर्थ भक्त शिवभक्त यांनी रविवारी रात्रीच मुक्कामी सज्जनगडावर येत मशाल महोत्सव याचा अनुभव घेण्यात आला यावेळी इतिहासाचा वारसा जतन करत असल्यामुळे यावेळी आयोजकांचे आभार मानण्यात आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFortगडDiwaliदिवाळी 2022