शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यात टिकाव घालून शेतमजुराचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 17:47 IST

बांधावर चेंबर काढण्यासाठी खड्डा खोदत असताना झालेल्या वादातून शालीवान जयसिंग पवार (वय ३३, रा. धावडशी, ता. सातारा) यांचा एकाने डोक्यात टिकाव घालून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या प्रकारानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपीला अटक केली.

ठळक मुद्देडोक्यात टिकाव घालून शेतमजुराचा खूनकारण अस्पष्ट : आरोपीला तत्काळ अटक

सातारा : बांधावर चेंबर काढण्यासाठी खड्डा खोदत असताना झालेल्या वादातून शालीवान जयसिंग पवार (वय ३३, रा. धावडशी, ता. सातारा) यांचा एकाने डोक्यात टिकाव घालून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या प्रकारानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपीला अटक केली.अनिल तुकाराम पवार (मूळ रा. मकनापूर लमाण तांडा, विजापूर कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सचिन पवार (रा. धावडशी, ता. सातारा) याचे शेत कळंबे, ता. सातारा गावच्या हद्दीत आहे. त्याची पाण्याची बारी असल्याने चेंबर काढून त्याला पाईप जोडायची होती. त्यासाठी सचिन याने शालीवान पवार आणि अनिल पवार या दोघांना तेथे कामासाठी नेले होते.

हे दोघे शेताच्या बांधावर खड्डा खोदत होते. त्यावेळी टिकाव अनिल पवारच्या हातात होते. याचवेळी दोघांमध्ये वाद झाला. हा वाद क्षणातच विकोपाला गेला आणि अनिलने हातात असलेले टिकाव शालीवान याच्या डोक्यात मारले. तसेच मानेवर आणि पाठीवरही टिकावाचे घाव घातले. सर्व घाव वर्मी लागल्याने शालीवान रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर अनिल पवार तेथून पसार झाला. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या सचिनने याची माहिती गावातील लोकांना दिली.सातारा तालुका पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सचिन पवार आणि इतर लोकांकडून माहिती घेतल्यानंतर अनिल पवार हा फरार झाल्याचे पोलिसांना समजले. मात्र, पोलिसांनी वेगवेगळ्या टीम तयार करून अनिल पवारला शोधून काढून त्याला काहीतासांतच अटकही केली. त्याच्याकडे पोलीस कसून चौकशी करत असून, हा खून नेमक्या कोणत्या कारणातून झाला, हे चौकीशीअंती स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर