शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

सत्ताधारी-विरोधकांमध्ये तू-तू मै-मै!

By admin | Updated: September 24, 2016 00:21 IST

वाई पालिका सभा : यशवंतनगर ग्रामपंचायतीचा घनकचरा पालिकेच्या कचरा डेपोत टाकण्यास प्रतिबंध

वाई : वाई पालिकेत १४ व्या वित्त आयोगातील शिल्लक असलेल्या ९० लाखांचा धुरळा करण्याचा डाव सत्ताधारी आघाडी करत असल्याचा आरोप विरोधक जनकल्याण आघाडीचे नगरसेवक सचिन फरांदे यांनी विशेष सर्वसाधारण सभेत केला. गांडूळखत प्रकल्पाबाबत वाईत गांडुळाचा अजगर झाला आहे. अशा शब्दात या विषयाची फरांदे यांनी खिल्ली उडविली. त्यावरून नगराध्यक्ष सीमा नायकवडी व विरोधी पक्षनेते सचिन फरांदे यांच्यात जोरदार खडाजंगी होऊन हा विषय तहकूब ठेवण्यात आला. नगराध्यक्ष सीमा नायकवडी यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी आशा राऊत यांच्यासह नगरसेवक, पालिकेचे अधिकारी यांच्या उपस्थितीत विशेष सर्वसाधारण सभेस सुरुवात करण्यात आली. सभेपुढे ऐकूण २० विषयांपैकी दोन विषयांवर जोरदार खडाजंगी होऊन १८ विषयांना मंजुरी देण्यात येऊन दोन विषय तहकूब ठेवण्यात आले. तीर्थक्षेत्र आघाडीने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वसाधारण सभेत विषय ठेवल्याचे विरोधकांनी दाखवून देऊन विषय पत्रिकेतील रविवार पेठ, पवार वस्ती ते भारतीय विद्यालय पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करण्याच्या विषयाला मुख्याधिकाऱ्यांची मान्यता नसल्याने या विषयावर विरोधक सचिन फरांदे यांनी मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले. तसेच बांधकाम विभागातील निविदा व कोटेशन विषय तहकूब ठेवण्यात आला. शहरातील काही रस्त्यांवर टाकावयाच्या मुरूमा संदर्भात सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी शहरात ट्रॉलीला मुरूमाचा दर ९०० रुपये असताना तीन हजार रुपये ट्रॉलीला ठरविणे योग्य नव्हे असा सूर आळविला असला तरी सचिन फरांदे यांनी जोरदार विरोध करीत हाणून पाडला. अनधिकृत बांधकाम असणाऱ्यांना नळकनेक्शन दिले जाऊ नये, अनधिकृत बांधकाम असणाऱ्यांकडून घरपट्टी वसूल करून त्यांना अनधिकृत करू शकत नाही यावर विरोधकांनी आवाज उठविला असता मुख्याधिकारी यांनी या गोष्टीला असहमती दर्शविली. वाईतील पालिकेच्या कचरा डेपोत यशवंतनगर ग्रामपंचायतीचा व औद्योगिक वसाहतीतील कचरा टाकण्यात येत असल्याचे नगरसेवक दत्तात्रय खरात यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर पंचायतीला दरमहा एक लाख रुपये कर आकारण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष सीमा नायकवडी यांनी सभागृहास सांगितले. तसेच ओला कचरा व सुखा कचरा नियमानुसार वेगळा केला जात नाही. याबद्दल महेंद्र धनवे यांनी आक्षेप घेतला. गांडूळखत प्रकल्पाच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. परंतु त्यातून खतनिर्मिती मात्र नगण्य होत असल्याने सभेत विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. अधिकारी नारायण गोसावी यांना समाधानकारक उत्तर सभागृहात देता आले नाही. नगरसेवक अनिल सावंत यांनी वाईतील शौचालयाची अवस्था अतिशय दयनीय झाल्याचे निदर्शनास आणून देऊन त्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. शहरात विविध ठिकाणी व्यायाम शाळा बांधणे, व्यायामाचे साहित्य खरेदी करणे, नगरपालिकेची जुनी इमारत भाडे तत्त्वावर देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे निर्णय घेणे, रस्त्याची गटार बांधकाम करणे आदी अठरा विषयांना मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी) पालिकेचा कारभार आंधळं दळतंय.. पालिकेची निवडणूक जवळ आली असून, सत्ताधारी त्यादृष्टीने व्यूहरचना करून सर्वसाधारण सभा बोलावत आहेत. सभागृहापुढे सत्ताधारीच विषय ठेवत असून, त्यांचेच नगरसेवक विरोध असल्याचा कांगावा करत प्रशासनाला धारेवर धरण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. वाई पालिकेच्या कारभारावर कोणाचाही अंकुश नसून कोणताही विभाग व्यवस्थित काम करत नसल्याने विरोधकांनी सध्या पालिकेचा कारभार आंधळं दळतंय... पीठ खातंय अशी अवस्था असल्याची टीका केली आहे.