शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

रुमानियाच्या चोरट्यांचे दिल्लीपासून गल्लीपर्यंत गुन्हे!, ‘एटीएम’मधून पैशांपूर्वी चोरायचे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 18:08 IST

सुमारे दोन वर्षांपूर्वी ते ‘टुरिस्ट व्हिसा’वर भारतात आले होते. मात्र दिल्लीमध्ये एका गुन्ह्यात ते अडकले. त्याठिकाणी त्यांना अटक झाली.\

संजय पाटीलकऱ्हाड : आर्थिक व्यवहार जेवढे ‘डिजिटल’ होताहेत तेवढेच चोरटेही ‘हायटेक’ होत असल्याचे दिसते. सुमारे दोन वर्षांपूर्वी रोमानियातून भारतात आलेल्या ‘त्या’ दोघांनीही चोरीसाठी अनोखी शक्कल लढवली. बनावट एटीएम कार्डचा वापर करुन त्यांनी अनेकांचे पैसे हडपले. दिल्ली, मुंबईसह अनेक मेट्रो सिटीमध्ये त्यांनी असे गुन्हे केले आणि अखेर कऱ्हाडमध्ये ते गजाआड झाले.इस्फॅन लुस्टीन जुओर्गल (वय २९) व लुनेट व्हसइल गॅबरिअल (२८, दोघे रा. रुमानिया) अशी या चोरट्यांची नावे आहेत. मलकापुरातील एका एटीएम केंद्रात वेगवेगळ्या कार्डच्या माध्यमातून पैसे काढण्याचा प्रयत्न करीत असताना या दोघांना रविवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता पोलिसांसमोर अनेक धक्कादायक खुलासे झाले. दिल्लीतून सुरू झालेला या दोघांचा गुन्हेगारीचा प्रवास कऱ्हाडपर्यंत पोहोचला असून त्यांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये गुन्हे केल्याचे प्रथमदर्शनी उघडकीस येत आहे.पोलिसांनी अटक केलेले इस्फॅन व लुनेट हे दोघेही रोमानिआ देशाचे रहिवासी आहेत. सुमारे दोन वर्षांपूर्वी ते ‘टुरिस्ट व्हिसा’वर भारतात आले होते. मात्र दिल्लीमध्ये एका गुन्ह्यात ते अडकले. त्याठिकाणी त्यांना अटक झाली. त्यामुळे त्यांच्या व्हिसासह इतर कागदपत्रे न्यायालयात जमा करण्यात आली. दिल्लीतील त्या गुन्ह्यातून त्यांना जामीन मिळाल्यानंतर ते तेथून बाहेर पडले आणि देशातील वेगवेगळ्या शहरात ठराविक कालावधीसाठी त्यांनी वास्तव्य केले असल्याचे पोलिसांच्या चौकशीतून समोर आले आहे.कोल्हापूरमध्ये २५ नोव्हेंबरपासून वास्तव्यआरोपींकडील कार्ड एकाच रंगाचे असून त्यावर काहीही लिहिलेले नाही. त्यामुळे कोणत्या कार्डचा पिन क्रमांक किती आहे, हे समजण्यासाठी त्यांनी त्या कार्डवर पांढरे स्टिकर चिटकवले असून स्टिकरवर पिन क्रमांक लिहिला आहे. कोल्हापुरात हे आरोपी २५ नोव्हेंबरपासून वास्तव्यास होते. तेथील एका सहकारी बँकेच्या एटीएम केंद्रातून वारंवार त्यांनी पैसे काढले. त्यावेळी तक्रारी वाढल्यामुळे संबंधित बँकेने त्यांच्या एटीएम केंद्रात केवळ त्यांच्याच बँकेचे एटीएम चालेल, अशी सिस्टिम केली आणि कोल्हापुरात पैसे काढण्यास अडचणी येऊ लागल्यामुळे आरोपी कऱ्हाडमध्ये सहकारी बँकांचे एटीएम शोधत आले होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी