शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आलं अंगावर, ढकल केंद्रावर हीच राज्य शासनाची भूमिका : केशव उपाध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 09:55 IST

BJP Satara- केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला भरपूर मिळाले आहे. पण, राज्य सरकारला काही करताच येत नाही. त्यामुळे आलं अंगावर की ढकल केंद्रावर अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारची झालेली आहे, अशी घणाघाती टिका

ठळक मुद्देआलं अंगावर, ढकल केंद्रावर हीच राज्य शासनाची भूमिका : केशव उपाध्ये कोरोनात सर्वसामान्यांना मदत केला नसल्याचाही आरोप

सातारा : केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला भरपूर मिळाले आहे. पण, राज्य सरकारला काही करताच येत नाही. त्यामुळे आलं अंगावर की ढकल केंद्रावर अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारची झालेली आहे, अशी घणाघाती टिका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली. दरम्यान, उपाध्ये यांनी कोरोनामध्ये राज्याने सर्वसामान्यांना काहीही मदत केली नसल्याचाही आरोप केला.येथील शासकीय विश्रामगृहात केंद्रीय अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत उपाध्ये बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, सुनिशा शहा, आशा पंडित, सिध्दी पवार आदी उपस्थित होते.केशव उपाध्ये म्हणाले, कोरोनामुळे जगात हाहाकार माजलेला आहे. सर्व देशांची अर्थव्यवस्था मोडकळीस आली असताना केंद्र शासनाने एक आदर्श आणि देशाला आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. आर्थिक आणि पायाभूत सुधारणा, गरीब आणि शेतकरी यांचाही विचार या अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. कोरोनामुळे आरोग्याचा विषय समोर आला. त्यामुळे आरोग्य विभागाच्या तरतुदीत १३७ टक्के वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी कृषी कर्जात वाढ केली आहे.केंद्राने आदर्श असा अर्थसंकल्प जाहीर केला असलातरी महाराष्ट्र सरकारला काहीच करता येत नाही. त्यामुळे सतत केंद्रावर टीका करण्याचे काम सुरू असते. केंद्रीय अर्थसकंल्पातून महाराष्ट्रालाही भरपूर मिळालेले आहे. तरीही महाराष्ट्राला काहीही मिळाले नसल्याची राज्याची भूमिका आहे. कोणताही आकस न ठेवता राज्याला केंद्राने भरपूर दिले आहे.इंधन दरवाढीचा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर उपाध्ये म्हणाले, ह्यमहाराष्ट्रात पेट्रोल, डिझेलचा दर सर्वाधिक आहे, याला कारण राज्याचा कर. राज्याने इंधनावरील अधिभार कमी करावा. तसे झाले तरच सर्वांनाच दिलासा मिळेल.ह्णसातारा पालिका निवडणूक लढविणार...सातारा नगरपालिकेची निवडणूक भाजप लढविणार का असा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर केशव उपाध्ये यांनी भाजप प्रत्येक नगरपालिका निवडणूक लढवत आहे. मग, सातारा पालिकेची निवडणूक पक्ष १०० टक्केच लढवेल, असे स्पष्टपणे सांगितले.

 

टॅग्स :BJPभाजपाSatara areaसातारा परिसर