शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील ज्वेलर्सच्या दुकानावरील दरोडा उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 11:45 IST

सातारा येथील सदाशिव पेटेतील ज्वेलर्सच्या दुकानावर काही दिवसांपूर्वी दरोडा टाकून सुरक्षा रक्षकाला मारहाण करणाऱ्या तिघांना अटक करण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आले आहे.

ठळक मुद्देसाताऱ्यातील ज्वेलर्सच्या दुकानावरील दरोडा उघडकीसतिघांना अटक : पुणे जिल्ह्यातील दोघांचा समावेश

सातारा : येथील सदाशिव पेटेतील ज्वेलर्सच्या दुकानावर काही दिवसांपूर्वी दरोडा टाकून सुरक्षा रक्षकाला मारहाण करणाऱ्या तिघांना अटक करण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आले आहे.गणेश सुरेश जाधव, बाबुलाल अंकुश पिटेकर (दोघे रा. खेड, जि. पुणे सध्या रा. नामदेववाडी झोपडपट्टी, सातारा), अर्जुन दौलत पवार (रा. नामदेववाडी झोपडपट्टी, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.याबाबत अधिक माहिती अशी, सदाशिव पेठेतील राधाकृष्ण ज्वेलर्स या दुकानात सोमवार, दि. २४ रोजी पहाटे दोनच्या सुमारास पाच ते सहा दरोडेखोरांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत सुरक्षा रक्षक बाळकृष्ण गोडसे यांना मारहाण करत दुकानाचे शटर उचकटले. त्यानंतर दुकानातील सुमारे २८ हजार रुपये किंमतीचा सोन्या चांदीचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला होता.

या घटनेनंतर सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दुकान आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. सीसीटीव्ही फुटेजमधील एका संशयिताची ओळख पटल्यानंतर दरोडेखोर हे शहरातून बाहेर गेले नसावेत, असे गृहित धरून पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली.जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी तातडीने दरोडेखोरांच्या अटकेचे आदेश शाहूपुरी पोलिसांना दिले होते. त्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी सहकाऱ्यांना दरोडेखोरांचा तपास करण्याच्या सूचना दिल्या. अर्जुन पवारवर पोलीस लक्ष ठेवून होते. तो रात्री घरी आल्याचे समजताच पोलिसांनी त्याला पकडले. त्यानंतर त्याच्या दोन्ही साथीदारांना ताब्यात घेतले.

अवघ्या तीन दिवसात संशयित आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे हे करत आहेत.जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हसन तडवी, हिम्मत दबडे, लैलेश फडतरे, अमित माने, ओंकार यादव, मोहन पवार, स्वप्नील कुंभार, पंकज मोहिते, तुषार पांढरपट्टे, मनोहर वाघमळे यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर