शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षितता अन् सुविधांनी ठोसेघर पर्यटकांसाठी सज्ज-शंकरराव चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 20:21 IST

ठोसेघर धबधबा बघायला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे त्याचा नावलौकिक टिकविण्याची मोठी जबाबदारी आमच्यावर आहे. - शंकरराव चव्हाण, अध्यक्ष, ठोसेघर वनव्यवस्थापन समिती

ठळक मुद्देचेंजिंग रूमसह, न्याहरीसाठी स्वतंत्र सोय

प्रगती जाधव-पाटील ।उंचावरून फेसाळत कोसळणारा ठोसेघरचा धबधबा पाहण्यासाठी आता पर्यटकांची पावले याकडे वळू लागली आहेत. गेल्या कित्येक वर्षात पर्यटकांच्या अपघाताचे गालबोट लागले नाही, हे व्यवस्थापन समितीचे यश म्हणता येईल. वर्षभर पर्यटकांच्या सुरक्षिततेचा आणि सुविधांचा विचार करून यंदा केलेल्या उपाययोजनांविषयी ठोसेघर वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष

शंकरराव चव्हाण यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला संवाद..!प्रश्न : पर्यटकांसाठी यंदा कोणत्या विशेष सोयी केल्या आहेत?उत्तर : ठोसेघर धबधब्याला भेट द्यायला येणारे पर्यटक येथे भिजण्याचाही मनमुराद आनंद घेतात; पण त्यानंतर त्यांना चेंजिंग रुमची सोय नव्हती. यंदा महिला आणि पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र चेंजिंग रुमची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेकदा सोबत आणलेला डबा खायला पर्यटकांना बसता येत नाही. अशांसाठीही स्वतंत्र बैठकव्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी तयार करण्यात आलेल्या हॉलमध्ये पर्यटक स्नेह भोजनाचा आनंद घेऊ शकतात. ठोसेघर धबधब्याविषयी नवीन माहिती दर्शविणारे व्हिडिओ डॉक्युमेंटरीही पर्यटकांना पाहता येणार आहे.

प्रश्न : येणाºया पर्यटकांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत?उत्तर : ठोसेघर वनव्यवस्थापन समिती दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. मात्र, येथे येणाºया पर्यटकांनी निसर्गात वावरतानाचे भान ठेवणे आवश्यक आहे. फोटो आणि सेल्फीच्या मोहापायी आपला जीव धोक्यात घालण्याचे टाळावे. ठोसेघरची माती घसरडी आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत येथे चालणं जिकिरीचं असतात. त्यातच जर एखाद्या पर्यटकाने मद्यपान केले तर त्याचा अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे येथे येताना मद्यपान करणं टाळावं. गेल्या काही वर्षांत पर्यटकांनीच याबाबत स्थानिकांना सांगितल्याने, यंदा पोलीस यंत्रणाही सजग झाली आहे.डोम कॅमेराधबधब्याकडे जोणाºया पर्यटकांच्या वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पार्किंग परिसरात डोम कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पार्किंगमध्ये होणाºया छोट्या-मोठ्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणं सहज शक्य होणार आहे. यामुळे चोरी आणि गाड्यांचे होणार नुकसान टाळणं व्यवस्थापन समितीला सहज शक्य होणार आहे.पोलिसांची गस्त

धबधबा पाहायला येणारे अनेक परगावचे पर्यटक शनिवार आणि रविवारी येतात. या दिवसांत वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून गस्त घालण्यात येणार आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही पावले उचलली जात आहेत.

नवा छोटा स्पॉटठोसेघर धबधबा पाहण्याबरोबरच याच परिसरातून वाहणाºया एका छोट्या धबधब्याचा शोध व्यवस्थापन समितीला लागला आहे. हा छोटा धबधबा यंदा पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र बनणार असल्याचे मानलं जात आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर