शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
5
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
6
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
7
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
8
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
9
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
10
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
11
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
12
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
13
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
14
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
15
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
16
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
17
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
18
उत्तर बार्शी भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर, नरसिंह मंदिर पाण्याखाली!
19
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
20
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर

ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मलकापुरात अपघाताचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:37 IST

मलकापुरातील उपमार्गातून खुदाई करत विविध कंपन्यांची ऑप्टीकल फायबर केबल टाकण्यासाठी स्पर्धाच लागलेली असते. काही दिवसांपासून पूर्वेकडील उपमार्गावर चर काढून ...

मलकापुरातील उपमार्गातून खुदाई करत विविध कंपन्यांची ऑप्टीकल फायबर केबल टाकण्यासाठी स्पर्धाच लागलेली असते. काही दिवसांपासून पूर्वेकडील उपमार्गावर चर काढून ऑप्टीकल फायबर केबल टाकण्याचे काम एका कंपनीला दिले आहे. संबंधित कंपनी सबकंत्राटदाराकडून हे काम करून घेत आहे. मात्र, संबंधित कंत्राटदाराने हे काम करत असताना नियम धाब्यावर बसवून काम करणे सुरूच ठेवले आहे. काम झाल्यानंतर चर व खड्डे केवळ माती व दगडाच्या सहाय्याने बुजवले जातात. तर काही ठिकाणी उकरलेली माती तशीच ठेवली जाते. रात्रीच्यावेळी जेसीबीच्या सहाय्याने चर काढतात. केबल टाकून झाल्यावर जेसीबीनेच ती बुजवतात. त्यामुळे अनेक ठिकाणी दगड व मातीचे ढीग तसेच पडलेले आहेत. केबलचा जोड असणाऱ्या ठिकाणी मोठा खड्डा तयार केला आहे. त्याला सुरक्षिततेसाठी केवळ पट्ट्या बांधल्या जातात. असे खड्डे रात्रीच्यावेळी धोकादायक ठरत आहेत.

अनेक ठिकाणी चर बुजवण्यासाठी लावलेल्या ढिगातील खडीमिश्रीत माती कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे उपमार्गावर पसरल्याने सायकलसह दुचाकी घसरण्याच्या घटना घडत आहेत. खडीमिश्रीत माती कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे उपमार्गावर पसरल्याने सायकलसह दुचाकी घसरण्याच्या घटना घडत आहेत.

- कोट

कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे रस्त्यावर दगडमाती पसरली आहे. दोन शाळकरी मुलांच्या सायकली घसरून पडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाचा हात फ्रॅक्चर झाला आहे. वाहनाच्या वर्दळीने उपमार्गालगतच्या व्यावसायिकांसह प्रवाशांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.

- नितीन काशिद-पाटील

शिवसेना तालुकाप्रमुख

- चौकट

नेमकी नुकसानभरपाई कुणाकडे?

मलकापुरातील महामार्गासह दोन्हीही उपमार्ग रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित आहेत. विविध कंपनीच्या केबल टाकण्याच्या कामाला संबंधित शासकीय विभाग की पालिका, यापैकी नेमके कोण परवानगी देते? या कामात झालेल्या रस्त्याच्या नुकसान भरपाईची जबाबदारी नेमकी कोणाकडे आहे, याचा शोध घेण्याची गरज आहे.

- चौकट

अवजड वाहनांचे चाक खोलात

चर काढतानाच केबल टाकली आहे. मात्र, साधारणपणे प्रत्येक शंभर मीटर अंतरात केबल जोडणीसाठी खोल खड्डे खणण्यात आले आहेत. हेच खड्डे धोकादायक बनले आहेत. चर व खड्ड्यांमध्ये वाहने अडकण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

फोटो : १८केआरडी०१

कॅप्शन : मलकापूर येथे केबलसाठी चर खोदण्याचे काम सुरू असून ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे खडीमिश्रीत माती उपमार्गावर पसरली आहे. (छाया : माणीक डोंगरे)