शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

पंपावर इंधन तसं साइटवर सिमेंट महागलं !, बांधकामाच्या खर्चात झाली वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 19:00 IST

बांधकामासाठी लागणारे स्टील, सिमेंट, वाळू, खडी, विटा यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

सागर गुजरसातारा : इंधन दरवाढीचा परिणाम जसा इतर क्षेत्रांवर झालेला आहे तसाच बांधकाम क्षेत्रामध्ये अत्यंत प्रतिकूल परिणाम पाहायला मिळतो आहे. इंधन दरवाढीमुळे बांधकाम साहित्याचे दर गगनाला भिडले असून, घरांच्या निर्मितीचा खर्चदेखील वाढला असल्याने सर्वसामान्य जनतेला याचा फटका बसतो आहे.बांधकामासाठी लागणारे स्टील, सिमेंट, वाळू, खडी, विटा यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. याशिवाय बांधकाम साहित्याच्या वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या डिझेलच्या किमती मोठी दरवाढ झाली त्यामध्ये भरीत भर म्हणून वस्तू व सेवा कर परिषदेने बांधकाम साहित्यावरील करामध्ये पाच टक्क्यांवरून १८ टक्के म्हणजे तब्बल १३ टक्क्यांनी वाढ केली त्यामुळे बांधकामाच्या प्रति चौरस फूट खर्चामध्ये सरासरी ३०० रुपयांची वाढ झाली आहे. साहजिकच बाजारात थोडीशी तेजी अनुभवणाऱ्या व्यावसायिकांवर चिंता पसरली आहे. बाजारातील मागणीपेक्षा पुरवठा जास्त असल्यामुळे ग्राहकांकडून अधिक दर मिळत नाही आणि बांधकाम खर्च वाढल्यामुळे नफ्यातील घट चुकत नाही, अशी त्यांची अवस्था झालेली आहे. विशेषतः राज्यात नव्याने सुरू झालेल्या बांधकाम प्रकल्पांसाठी हा विषय चिंतेचा आहे.वित्तीय संस्था अडचणीत सापडल्या पाठोपाठ कोरोनाची साथ पसरली आणि बांधकाम व्यावसायिकांचे कंबरडे मोडले. या व्यवसायाचा विकासदर उणे घरामध्ये घसरला आहे, ही गंभीर स्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने विविध सवलतींचा योजना जाहीर केल्या, त्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेचा समावेश होता तसेच राज्य सरकारनेही मुद्रांक शुल्क नोंदणी खर्चामध्ये कपात करून या व्यवसायाला दिलासा दिला होता शासनाच्या टेकूवर हा व्यवसाय पुन्हा एकदा सकारात्मक वळणावर येत असतानाच स्टीलचे भाव सरासरी ६६ रुपये प्रतिटन वर गेले.दीड वर्षांपासून २७४ रुपयांना विकले जाणारे सिमेंटचे पोते ३७० रुपयांवर गेले प्रती घनफूट ४५०० रुपये आकारल्या जाणाऱ्या काँक्रीटचा दर पाच हजार सहाशे रुपयांवर गेले असून, बांधकाम व्यावसायिकांना ग्राहकांच्या पसंतीस दरात घरकुल उपलब्ध करताना तारेवरची कसरत करावी लागते आहे. तीन वर्षांपूर्वी असेच बांधकामाचे दर वाढत होते तेव्हा केंद्र सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.अशी झाली आहे बांधकाम साहित्याची दरवाढसळई : ६६ रुपये प्रति किलोसिमेंट बॅग : तीनशे सत्तर रुपयेएसएससी ब्लॉक : ३६०१ घनमीटररेडी मिक्स काँक्रिट : ५६०० घनमीटरकृत्रिम वाळू : ७०८८ प्रति शंभर घनफूटखडी : ३६२३ प्रति शंभर घनफूटडिझेल : १०२ रुपये प्रति लिटरमार्च २०२१चे दरसळई : ६० रुपये प्रति किलोसिमेंट बॅग : ३३२ रुपयेएसएससी ब्लॉक : ३२५० घनमीटररेडी मिक्स काँक्रिट : ४७५० घनमीटरकृत्रिम वाळू : ६३०० प्रति शंभर घनफूटखडी : २५७३ प्रति शंभर घनफूटडिझेल : ८७ रुपये प्रति लिटर

बांधकाम साहित्याच्या दरात गेल्या एक वर्षात मोठी वाढ झाली आहे. केंद्र आणि राज्य शासनाने उपाययोजना केल्या होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा बांधकाम व्यवसाय उभारी घेत असतानाच साहित्याच्या दरवाढीने प्रति चौरस फूट तीनशे रुपयांचा फटका बसत आहे. ही वाढ सर्वसामान्य नागरिकांना सहन करावी लागणार असल्यामुळे केंद्र शासनाने ही अवास्तव दरवाढ रोखण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. - मजीद कच्छी, सचिव क्रेडाई सातारा

कोरोनाच्या काळात लोकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण पहायला मिळते. त्यातच इंधन दरवाढीमुळे घरांच्या किमती कमी ठेवणे बांधकाम व्यावसायिकांना शक्य होत नाही. नोकरीतील असुरक्षिततेमुळे घरासारख्या मोठ्या खर्चात पडण्यापेक्षा इलेक्ट्रॉनिक वस्तू, छोटी वाहने खरेदी केली जातात. इंधन दरवाढ कमी झाली तरी वस्तूंवर वाढलेला जीएसटी कर हाही कमी होणे गरजेचे आहे.  - विवेक निकम, उपाध्यक्ष, क्रेडाई, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFuel Hikeइंधन दरवाढ