महिला, भगिनीमाता या राष्ट्रप्रगतीसाठीच्या सर्वप्रथम भागीदार आहेत. असे असताना झी मराठीवर ‘देवमाणूस’ ही मालिका दाखवली जात असून, त्यात महिलांबाबत असभ्य वर्तन दाखविले आहे. या मालिकेत महिलांची कशा प्रकारे फसवणूक केली जाते, हे दाखविण्यात आले आहे. साताऱ्यातील काही संधिसाधू लोक, निर्माते आणि दिग्दर्शक असे चित्रीकरण करून लाखो रुपये नफा कमवत असतात. वाई तालुक्यात घडलेल्या हत्याकांडाचा उदोउदो करणारी मालिका दाखविली जात आहे, ही आश्चर्यकारक बाब आहे. साताऱ्याच्या अस्मितेवर घाला घालणारी ही गोष्ट आहे. महिलांची बदनामी करून एकमात्र खून करणाऱ्यास या मालिकेत हिरो दाखवून त्या अनुषंगाने आपली झोळी भरण्याचे काम केले जात आहे. ही मालिका त्वरित बंद करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, मदन खंकाळ, विक्रम वाघमारे, किरण बगाडे, जयवंत कांबळे, भिकाजी सावंत, योगेश माने, किरण ओव्हाळ, आदी उपस्थित होते.