शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

रिंकू ओसवाल खूनप्रकरणी पतीला जन्मठेप -हुंड्यासाठी गळा दाबला : जिल्हा न्यायालयाचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 20:42 IST

साताऱ्यातील बहुचर्चित रिंकू ओसवाल खूनप्रकरणी पती भरत कांतिलाल ओसवाल (वय ३१, रा. आयटीआय जवळ, गुलमोहोर कॉलनी, सातारा) याला बुधवारी जिल्हा सत्र न्यायाधिशांनी जन्मठेपेची शिक्षा

सातारा : साताऱ्यातील बहुचर्चित रिंकू ओसवाल खूनप्रकरणी पती भरत कांतिलाल ओसवाल (वय ३१, रा. आयटीआय जवळ, गुलमोहोर कॉलनी, सातारा) याला बुधवारी जिल्हा सत्र न्यायाधिशांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हुंड्यासाठी गळा आवळून तिचा खून केल्याचा आरोप भरतवर होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, भरत ओसवाल यांचा रिंकू ऊर्फ भाग्यश्री हिच्यासोबत विवाह झाला. विवाहात रिंकूच्या माहेरच्या मंडळींनी ठरल्याप्रमामे कमी दागिने दिले. यावरून पती भरत उर्वरित आठ तोळे दागिने घेऊन येण्याच्या कारणावरून रिंकूला मारहाण व शिवीगाळ करत छळ करत होता. लग्नाला तीन वर्षे झाली तरी मूलबाळ होत नसल्याने भरतकडून दिवसेंदिवस त्रास वाढ होत होता.

१९ आॅक्टोबर २०१४ रोजी रात्री जेवण केल्यानंतर रिंकू व भरत यांच्यामध्ये भांडणे झाली. यावेळी भरतने तिचा गळा आवळला. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. मात्र, माहेरच्या लोकांनी रिंकूचा मृत्यू संशयास्पद असल्याचे मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मृतदेह ताब्यात घेत अंत्यसंस्कार करण्यात आला. याप्रकरणी रिंकूची आईने शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

तत्कालीन पोलीस निरीक्षक एस. एल. पांढरे गुन्'ाचा तपास करून दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात सादर केले. न्यायाधीश डी. ए. ढोलकिया यांनी भरत ओसवाल याला जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावला. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी यांनी काम पाहिले. प्रॉसिक्युशनचे उपनिरीक्षक पी. के. कबुले, हवालदार सुनील सावंत, अजित शिंदे, शमशुद्दीन शेख, कांचन बेंद्रे, नंदा झांजुर्णे, शाहूपुरीच्या पैरवी अधिकारी रिहाना शेख यांनी मदत केली.शवविच्छेदन रिपोर्ट ठरला निर्णायकया खटल्यादरम्यान सरकारी पक्षातर्फे सादर केले शवविच्छेदन अहवाल आणि वैद्यकीय अधिकारी, मृत रिंकूची आई, काका यांच्यासह ११ जणांची साक्ष महत्त्वाची ठरली. साक्षी व परिस्थितीजन्य पुरावे ग्रा' धरून न्यायाधिशांनी शिक्षा सुनावली. 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMurderखूनCourtन्यायालय