शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

‘बालसंगोपन’चा अधिकार कार्यालय प्रमुखांनाच -- सातारा जिल्हा परिषदेचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 23:45 IST

कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या बालसंगोपन रजेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जिल्हा परिषदेने दप्तरी आदेशाद्वारे या रजा मंजूर करण्याचे किंवा नाकारण्याचे सर्वाधिकार कार्यालय प्रमुखांना दिल्याने

सातारा : कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या बालसंगोपन रजेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जिल्हा परिषदेने दप्तरी आदेशाद्वारे या रजा मंजूर करण्याचे किंवा नाकारण्याचे सर्वाधिकार कार्यालय प्रमुखांना दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. हा विषय ‘लोकमत’ने सातत्याने लावून धरला होता.

याबाबत अधिक माहिती अशी, शासन निर्णयानुसार बºयाच कर्मचाºयांनी बालसंगोपन रजा मिळाव्यात, यासाठी प्रशासनाकडे अर्ज केले होते. मात्र, जिल्हा परिषदेकडील रिक्त पदांची संख्या तसेच केलेले अर्ज मंजूर केल्यास प्रशासकीय कामकाजावर विपरित परिणाम होणार असल्याचं परिपत्रक काढलं. त्यानुसार रजा मंजुरीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न सुरू असून, पुढील सूचना निर्गमित होईपर्यंत याबाबत कोणताच निर्णय घेण्यात येऊ नये, असे स्पष्ट संकेत केले होते. जिल्हा परिषदेच्या या पत्रकामुळे कर्मचाºयांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.

याविषयी ‘लोकमत’ने बालसंगोपन रजा अंतर्गत किती अर्ज प्राप्त झाले, याचा शोध घेतला असता रजेसाठी अवघे २५ अर्ज आल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावर तातडीने उपाययोजनेची बैठक घेऊन याबाबत निर्णय देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते.त्यानुसार जिल्हा परिषदेने महत्त्वपूर्ण दप्तरी आदेश काढला आहे. त्यानुसार बालसंगोपन रजा देण्याचे अधिकार कार्यालय प्रमुखांकडे देण्यात आले आहेत. रजा मंजुरीबाबत रजा मंजुरीचा हिशोब संबंधित कर्मचारी यांच्या मूळ सेवा पुस्तकामध्ये स्वतंत्रपणे नमूद करणे बंधनकारककरण्यात आले आहे. या रजा मंजूर करताना रजा मंजुरीच्या आदेशाची प्रत संबंधित खातेप्रमुख व सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, सातारा यांच्याकडे द्यावे लागणार आहेत. जिल्हा परिषदेने बालसंगोपन रजेबाबत दिलेल्या या आदेशामुळे कर्मचाºयांमध्ये समाधानाचे वातावरण असून, त्यांनी भ्रमणध्वरीद्वारे ‘लोकमत’चे आभार मानले.या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे!शासकीय कामकाजाच्या प्रशासकीयदृष्ट्या अडथळा निर्माण होणार नाही, याची खातरजमा करून पर्यायी व्यवस्था करूनच ही रजा मंजूर करण्यात यावी, असे निर्देशित केले आहे.वर्षात ६० दिवसांपर्यंतच्या कमाल मर्यादेपर्यंत रजा मंजुरीबाबत प्रशासकीय कामकाजाची, कार्यालयाची निकड लक्षात घेऊन मंजूर करता येईल. कालावधी कमी-जादा करण्याचे अंतिम अधिकार प्रकरणपरत्वये संंबंधित कार्यालय प्रमुख यांच्याकडे राहणार आहे. 

बालसंगोपन रजेचा अधिकार कार्यालय प्रमुखांना देण्यात आला आहे. मात्र, कार्यालयाची निकड लक्षात घेऊन ही रजा रद्द करण्याचा किंवा कार्यालय प्रमुखांनी फेटाळलेली रजा विशेष बाब म्हणून मंजूर करण्याचा अधिकार माझ्याकडे राखून ठेवला आहे.- डॉ. कैलास शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषद