शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: कोल्हापूर नाक्यावर एकेरी मार्गातून उलटा प्रवास, वाहतूक ठप्प 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 16:19 IST

एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर वाहतूक कोंडी फुटली.

माणिक डोंगरेमलकापूर : कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल पाडण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. अरुंद रस्त्यामुळे एकेरी मार्गातून उलट जाणाऱ्या ट्रॅक्टरची खासगी बसला घासाघासी झाली. पूर्वेकडील उपमार्गावर एकेरी मार्गातून उलटा प्रवास करणाऱ्या ट्रॅक्टरचालकाच्या अंगलट आले. दोन्ही वाहने अडकल्याने एक तास वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांसह कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांना घाम फुटला होता.पुणे- बंगळुरू महामार्गावरचा येथील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल पाडण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. सहापदरीकरण कामाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले आहेत. कोल्हापूर नाका ते कृष्णा रुग्णालय व कृष्णा रुग्णालय ते कोल्हापूर नाका या दोन्ही उपमार्गावर एकेरी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, अनेकवेळा घाईघाईने शॉर्टकट मारण्यासाठी वाहनचालकांनी उलटा प्रवास करण्याचा सपाटाच लावला आहे. यामुळे अपघाताच्या शक्यता वाढल्या आहेत. आज, शुक्रवारी सकाळच्या सुमारास खासगी प्रवासी बस (एमएच ४८ एवाय १००५) ही प्रवासी घेऊन कऱ्हाडकडून कोल्हापूर दिशेला जात होती. पूर्वेकडील उपमार्गावर येथील बोराटे पेट्रोलपंपाजवळ आली असता समोरून उलट प्रवास करत आलेल्या ट्रॅक्टर (एमएच ०९ एफबी ९८१३) ची एकमेकाला घासाघासी झाली. दोन्ही वाहने पत्रा फाटून अडकल्यामुळे पुढेही जाता येईना आणि मागेही जाता येईना, अशी परिस्थिती झाली.

पर्यायी रस्ता नसल्यामुळे या किरकोळ अपघाताने सुद्धा पूर्वेकडील उपमार्गावरील वाहतूक एक तास ठप्प झाली होती. उलट प्रवास करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे झालेली वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी पोलिसांसह कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांना घाम फुटला होता. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर वाहतूक कोंडी फुटली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडTrafficवाहतूक कोंडी