शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

Satara: रेठरे खुर्दचे जवान अनिल कळसे यांना मणिपूरमध्ये वीरमरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 11:47 IST

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील रेठरे खुर्द येथील भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले अनिल दिनकर कळसे यांना बुधवार, दि. २० रोजी ...

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील रेठरे खुर्द येथील भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले अनिल दिनकर कळसे यांना बुधवार, दि. २० रोजी मणिपूर येथे सेवेत असताना अपघातात वीरमरण आले. त्यांच्यामागे आई, वडील, भाऊ, पत्नी, मुले असा परिवार आहे. या घटनेचे वृत्त गावात धडकताच गावकरी शोकसागरात बुडाले. शनिवारी सकाळी त्यांचे पार्थिव गावात आणले जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.याबाबतची मिळालेली अधिक माहिती अशी की, रेठरे खुर्दचे सुपुत्र हवालदार अनिल कळसे हे मणिपूर येथे भारतीय सैन्यदलात हवालदार म्हणून देशसेवा बजावत होते. भारतीय सेनेतील बॉम्बे इंजिनीअर ग्रुपमधील २६७ इंजिनीअर रेजिमेंटमध्ये सध्या ते कार्यरत होते. २९ सप्टेंबर, २००० मध्ये ते भारतीय सैन्य दलात भरती झाले. २०१७ मध्ये ते सैन्यातून निवृत्त झाले होते; परंतु त्यांनी सेवा वाढवून घेतली होती. पुढील वर्षी ऑगस्टमध्ये सेवेतून निवृत्त होणार होते.पुढील महिन्यात ते सुट्टीवर येणार असल्याचे त्यांनी कुटुंबीयांना कळविले होते; परंतु शुक्रवारी सकाळी त्यांना वीरमरण आल्याचे वृत्त धडकताच गावकरी शोकसागरात बुडाले. याबाबत ग्रामस्थांनी सांगितले की, बुधवारी दुपारी मणिपूर येथील सैनिक तळावर जेसीबीच्या साहाय्याने काम सुरू होते. जवान अनिल कळसे हे तेथे असताना त्यांच्या अंगावर झाड कोसळले व त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यात त्यांना वीरमरण आले. गुरुवारी सायंकाळपर्यंत त्यांच्यावर शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू होती. ती रात्री उशिरा पूर्ण झाली. शनिवारी सकाळी त्यांचे पार्थिव गावी येणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर