जाधव यांचा सत्कार
सातारा : जिल्हा राज्य सरकारी गट चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाचे कोषाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांचा सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्तीनिमित्त राज्य सरकारी गट चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्यावतीने जिल्हा सरचिटणीस घाडगे, सुरेखा चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमास सहकोषाध्यक्ष म. स. पांचाळ, लक्ष्मण भोसले, शशिकांत चांदणे आदी उपस्थित होते.
ग्राहक झाले हैराण
सातारा : उत्सवामुळे फुलांना मागणी वाढते. त्यामुळे त्यांचे दरही एवढे झालेत की फुलांच्या दरवाढीमुळे बाप्पांच्या पूजेसाठी भक्तांना अधिक किंमत मोजावी लागत आहे. गणेशोत्सवात बाप्पांच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत रोज पूजा व आरती केली जाते. पूजेबरोबर आरास करण्यासाठीही फुलांचा वापर केला जातो. त्यामुळे उत्सव काळात फुलांचे दर चांगलेच वाढलेले असतात.
कुलकर्णी यांचा सत्कार
सातारा : कराड येथील रा. गो. प्रभुणे संस्थेने विद्यारत्न पुरस्कार देऊन गौरविल्याबद्दल शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य अमित कुलकर्णी यांचा डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या येथील बालक मंदिराच्यावतीने नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी डेक्कन सोसायटीचे सदस्य अनंत जोशी, मुख्याध्यापिका हेमा जाधव, भारत मंदिराच्या मुख्याध्यापिका मंजिरी देशपांडे आदी उपस्थित होते.
आरोग्याशी खेळ
सातारा : मातीने भरलेल्या भाज्या धुण्यासाठी तसेच त्यांचा ताजेपणा टिकून राहण्यासाठी साठवलेल्या पाण्याचा वापर भाजी स्वच्छ करायला होत आहे. भाजी विक्रेत्यांकडून सुरू असलेला प्रयत्न नवीन आजारांना आमंत्रण देणारा ठरत आहे. शहर व उपनगरातील गल्लीबोळातून फिरून भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांकडून हे प्रकार वाढीस लागल्याचे गृहिणी सांगतात.
शेतीकामांना वेग
सातारा : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र, मागील दोन दिवसांपासून पश्चिम भाग वगळता जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. सध्या खरीप हंगामातील सोयाबीन, घेवडा, चवळी, मूग व वाटाणा या पिकांची पानगळ सुरू आहे. या पिकांत वाढलेले तण काढण्याची कामे सुरू आहेत.