आडसाली लावण जोमात
सातारा : यंदा जिल्ह्यात जोरदार पाऊस पडल्याने धरण आणि नद्यांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. परिणामी शेतात आडसाली लावणी सुरू झाली आहे. बहुतांश ठिकाणी आडसाली लावणी पूर्णही झाल्या आहेत.
वाहतुकीत अडथळा
सातारा : शहर व परिसरात रहदारीच्या रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे. या मोकाट जनावरांमुळे किरकोळ अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे.
वयोमर्यादा वाढवा
सातारा : शासकीय नोकरभरती अनेक वर्षे रखडल्याने या सेवेसाठी इच्छुक असणा-या उमेदवारांची वयोमर्यादा उलटून गेली आहे. त्यामुळे राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन शासकीय नोकरीत प्रवेशाचे वय तीन ते चार वर्षांनी वाढवावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
कारवाईची मागणी
सातारा : माळशिरस तालुक्यातील माळेवाडी येथील धनाजी साठे यांचे पार्थिव शेतातून नेण्यास काही लोकांनी विरोध केला. त्यामुळे पार्थिवाची १० तास विटंबना झाली. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी रिपाइंच्यावतीने निवासी जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.