शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम घाटातील लाल खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन!, सातारकर संशोधकांना संधी 

By प्रगती पाटील | Updated: September 26, 2023 12:41 IST

देशात पहिल्यांदाच पाच प्रजातींचा होणार प्रदीर्घ अभ्यास

प्रगती जाधव-पाटीलसातारा : आपल्या अस्तित्वासाठी जीवसृष्टीतील बहुतांश घटक स्थलांतर करतात. प्राणी आणि पक्ष्यांचे स्थलांतर सर्वश्रुत आहे. मात्र पश्चिम घाटासाठी प्रदेशनिष्ठ असलेल्या खेकड्यांच्या पाच प्रजातींचा प्रदीर्घ अभ्यास साताऱ्यातील संशोधक करणार आहेत. महादरे इकोलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात ‘मेरी’ या संस्थेचे संशोधक हा अभ्यास करणार आहेत.या संशोधनात खेकड्यांच्या पाच प्रजातींचा अभ्यास केला जाणार आहे. विशिष्ट हंगामात पठारावर येऊन, तर काही कालावधीनंतर पुन्हा सुप्त अवस्थेत जाणाऱ्या खेकड्यांविषयी हा अभ्यास केला जात आहे. भारतात गोड्या पाण्यातील खेकड्यांवर संशोधन होण्याची ही पहिलीच वेळ आहे. घाटाच्या पठारांवरील खेकड्यांच्या वर्तनशास्त्र व स्थलांतराचा अभ्यास या प्रकल्पातून केला जाणार आहे. हा अभ्यास पूर्ण होण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागणार आहे.संशोधनाबरोबरच स्थानिक लोकांची जनजागृतीही या प्रकल्पांतर्गत करण्यात येणार आहे. या संशोधनातून खेकड्यांची बरीच नावीन्यपूर्ण माहिती हाती लागणार असल्याचा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.

या पाच प्रजातींवर होणार संशोधन

  • बॅरीटेलपुसा कॅनीक्युलारीस,
  • इंग्लेथेपुसा फ्राँटो,
  • सह्याद्रीयाना अल्कोकी,
  • बारुसा ग्रासीलिमा,
  • घाटीयाना पुल्क्रा.
  • आणखी एक आहे तिची अजून ओळख पटलेली नाही.

पहिल्यादांच होणार गोड्या पाण्यातील खेकड्यांवर अभ्यासपश्चिम घाटातील पठारी प्रदेशात आढळणाऱ्या गोड्या पाण्यातील हंगामी खेकड्यांवर अभ्यास होणार आहे. हे खेकडे वर्षभराच्या कालावधीत जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांत सक्रिय असतात. इतर वेळी हे सुप्त अवस्थेत असतात. सक्रिय अवस्थेत प्रजनन कालावधीनंतर शरीराची संपूर्ण वाढ करून घेण्याबरोबरच सुप्त अवस्थेतील कालावधीत अतिरिक्त चरबीचा संचयही हे करतात. यामुळे सात महिने काहीही न खाता ते जिवंत राहू शकतात.

पश्चिम घाट आणि त्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना हा भारतासाठी निसर्गाचा एक अनमोल ठेवा आहे. खेकड्यांसारख्या छोट्या आणि काहीशा दुर्लक्षित जीवांवरील संशोधनामुळे येथील अनोख्या जैवविविधतेवर अधिक अभ्यास होऊन त्याच्या जतनासाठीचे प्रयत्न करता येतील. - सुनील भोईटे, मुख्य संशोधक, महादरे इकॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (मेरी), सातारा 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरResearchसंशोधन