शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पुन्हा अवकाळीनं अवकळा!

By admin | Updated: March 11, 2015 00:06 IST

सातारा जिल्ह्यात गारपिटीने दाणादाण : विजेच्या कडकडाटात मुसळधार पाऊस; कांदा, गहू, हरभऱ्यासह आंबा, डाळिंब फळबागांचे अतोनात नुकसान

सातारा : गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळीने पावसाने तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. रब्बी पिकांचे मोठे नुकसान पावसाने केले. शेतकऱ्यांनी काढून ठेवलेली ज्वारी, गहू, हरभरा मोतीमोल झाला. या संकटातून सावरत पावसाच्या तडाख्यातून वाचलेली उभी पिकं काढायला शेतकऱ्यांनी सुरुवात केली असतानाच अवकाळीने पुन्हा एकदा फटका दिला अन् बळीराजा पुरता कोलमडून गेला. जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट झाल्यामुळे पिकांसह फळबागांचेही अतोनात नुकसान झाले आहे.झाड अंगावर पडून बैल जखमीमाळीखोरा येथील विठ्ठल देवकुळे यांच्या घरासमोरील पिंपरणीचे झाड वादळी पावसात बैलाच्या अंगावर कोसळल्याने बैल जखमी झाला. बैलाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उभे राहता येत नसल्याचे समजल्यानंतर विठ्ठल देवकुळे व त्यांच्या पत्नी द्रौपदा यांना अश्रू आवरता आले नाहीत. शेतीसाठी या बैलाचा आधार होता, आता कुणाच्या जिवावर शेती करायची, अशी वेदना देवकुळे कुटुंबीयांनी व्यक्त केली. परिसरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. मार्डी, पळशी परिसरात झाडे कोलमडली; वैरण विखुरलीपळशी : माण तालुक्यातील मार्डी, पळशी, माळीखोरा परिसरात विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसात झाडे उन्मळून पडली तर शेतकऱ्यांनी गोळा करून ठेवलेली वैरण, हरभरा रानभर अस्ताव्यस्त विखुरला आहे. सुमारे दोन तास वादळी वारे आणि पावसाचा धुमाकूळ सुरू होता.हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतर शेतकऱ्यांनी उरलीसुरली सुगी उरकण्याची घाई सुरू केली होती. कुणी गहू कापून ठेवला होता कुणी हरभरा काढून ढिग मांडला होता. काही ठिकाणी ज्वारीची खुडणी करून वैरण गोळा करून ठेवली होती. पण धान्य घरी पोहोचण्यापूर्वी आणि वैरणीच्या गंजी लागण्याअगोदरच पावसाने घात केला. वैरण चिखलाने माखल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. कडब्याचे दरही वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.कऱ्हाडला अवकाळीने झोडपलेकऱ्हाड : मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक पडलेल्या अवकाळी पावसाने कऱ्हाड शहरासह तालुक्याला चांगलेच झोडपले. अचानक पडलेल्या पावसामुळे शहरातील बाजारपेठांतील व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले होते. सायंकाळच्या वेळी सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. अचानक पडलेल्या अवकाळी पावसाने काही ठिकाणी शेतीमालाचे तर काही ठिकाणी जनावरांच्या शेडचे नुकसान झाले. कांदा बियाण्यांचे वाफे उद्ध्वस्तसोमवारी सायंकाळी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. परिसरात काही शेतकऱ्यांनी कांद्याच्या बियाण्यांसाठी तरवे लावली होती. जोरदार पावसाने त्याचे वाफे वाहून गेले. त्यामुळे यंदा कांद्याच्या रोपांचा मोठा तुटवडा जाणवणार असल्याचे बोलले जात आहे.गारपिटीने आंबे गळालेमोठ्या कष्टाने दुष्काळी भागात शेतकऱ्यांनी फळबागा फुलविल्या आहेत. मात्र अवकाळीने डाळिंब, आंबा या फळबागांचे पावसाने मोठे नुकसान केले असून गारपिटीमुळे डाळिंब, कैऱ्या गळून पडल्या आहेत. फळांचा खच झाडाखाली दिसून येत आहे. पुन्हा फाटलं आभाळ... कसंतरी लावलं ठिगाळ!भुर्इंज : गेल्याच आठवड्यात पावसाने रौद्ररूप धारण करुन शेतकऱ्यांची दाणादाण उडवली होती. त्यामुळे ढसाढसा रडलेल्या शेतकऱ्याने झालेल्या नुकसानीचा विचार न करता दुसऱ्या दिवसापासून कंबर कसली आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली. मात्र या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा एकदा आज (दि. १0)भुर्इंज परिसरात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चांगलीच पळापळ झाली. शेतकऱ्यांसह विविध उद्योजकांची आपलं आहे ते वाचवण्यासाठी झालेली धावपळ पाहता फाटलं आभाळ आणि लावलं ठिगाळ अशीच परिस्थिती दिसून आली. आधीच्याच पावसाने ज्वारी, गहू काळवंडून गेले आहे. वाळत टाकलेल्या हळदीचे उत्पन्न धोक्यात आले आहे. एकदा झालं ते अपघातानं, असं समजून शेतकऱ्यांनी आहे ते पीक वाचवण्यासाठी कंबर कसली होती. पुन्हा असे होणार नाही अशी खात्री या बळीराजाची होती. मात्र मंगळवारी घडले भलतेच. अचानक आलेल्या पावसाने चांगलीच दाणादाण उडवली. हळद वाळत घातलेल्या शेतकऱ्यांनी जेवढी शक्य आहे तेवढी हळद झाकली. मात्र गहू, ज्वारी, हरभरा यासह विविध पिकांचे नुकसान अधिकच झाले. वीटभट्ट्या झाकल्यावीटभट्टीवाल्यांचे गेल्या पावसात मोठे नुकसान झाले, त्यामुळे त्यांनी ताडपत्रीची व्यवस्था केली होती. पण या पावसात ती व्यवस्था एखाद्या ठिगळाएवढीच राहिली. अनेक दुचाकीस्वार या पावसामुळे रस्त्याकडेला आडोसा घेऊन थांबले. निसर्गाचं ताळतंत्रचं सुटलं आहे, अशीच प्रतिक्रिया या सर्वांकडून व्यक्त होत होती.