शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीतच सुरू झाले पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दुरुस्तीचे काम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 18:47 IST

महामार्ग दुरवस्थेबाबत साताऱ्यात आॅक्टोबरमध्ये टोलविरोधी सातारा जनता नावाने सोशल मीडियावर सामान्यांची चळवळ सुरू झाली. समाजमाध्यमांद्वारे सुरू झालेली ही चळवळ पुढे व्यापक बनत गेली. जनसामान्यांचा रोष लक्षात घेत लोकप्रतिनिधींनीही यात सहभाग नोंदवला.

ठळक मुद्देतिप्पट मनुष्यबळ : वेळेत काम पूर्ण करण्यासाठी रिलायन्स ठेकेदाराचे युद्धपातळीवर प्रयत्न

सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोलनाका बंद पाडून केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महामार्गा दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर दिवसरात्र सुरू आहे. तिप्पट मनुष्यबळ लावून हे काम वेळेत पूर्ण करून देण्यासाठी रिलायन्स प्रयत्नशील आहे.

महामार्ग दुरवस्थेबाबत साताऱ्यात आॅक्टोबरमध्ये टोलविरोधी सातारा जनता नावाने सोशल मीडियावर सामान्यांची चळवळ सुरू झाली. समाजमाध्यमांद्वारे सुरू झालेली ही चळवळ पुढे व्यापक बनत गेली. जनसामान्यांचा रोष लक्षात घेत लोकप्रतिनिधींनीही यात सहभाग नोंदवला. प्रशासनाबरोबर बैठका घेऊन इशारा देऊनही महामार्गाची अवस्था सुधारली नसल्याच्या निषेधार्थ बुधवारी आनेवाडी टोलनाक्यावर टोल वसुली बंद करून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलनही केले. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

आक्रमक झालेले आंदोलक आणि प्रशासनाने सुनावलेल्या खडे बोलांमुळे महामार्गाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना रिलायन्सने ठेकेदारांना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ठेकेदारांनी मंगळवारी रात्रीपासूनच कामाला सुरुवात केली. चोवीस तास तीन शिफ्टमध्ये काम करून पहिल्या टप्प्यातील खड्डे मुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आंदोलकांना लेखी दिल्यानुसार हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांनी चक्क तिप्पट मनुष्यबळ लावले आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह हे काम निर्धारित वेळेत करण्याचा हिय्या केल्याचे दिसते.प्रशासनाच्या बैठकीनंतर मिळाला कामाला वेगमहामार्गावरील दुरवस्थेच्या विरोधात बुधवारी आंदोलन करणार असल्याचे निवेदन सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिल्यानंतर तातडीने मंगळवारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात जिल्हाधिकारी यांनी कणखर भूमिका घेतल्याने मंगळवारी रात्रीच रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. हे काम गुरुवार, दि. २० रोजी संध्याकाळी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले गेले आहे.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhighwayमहामार्गroad safetyरस्ते सुरक्षा