शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना टाडा, मकोका लावा; उदयनराजेंची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी  

By सचिन काकडे | Updated: March 27, 2025 19:23 IST

अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम मार्गी लागावे

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या प्रवृत्तींची जीभ छाटण्याची धमक आमच्यासह शिवप्रेमींमध्ये निश्चित आहे; परंतु आम्ही संयम राखून आहोत. केंद्र व राज्य शासनाने अशा प्रवृत्तींना धडकी भरवणारा मकोका, टाडासारखा अजामीनपात्र आणि दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा असलेला विशेष कायदा पारित करावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी दिल्ली येथे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन, त्यांना मागण्यांचे निवेदन दिले, तसेच विविध विषयांवर चर्चाही केली. निवेदनात नमूद केले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वधर्म समभावाचा विचार देत स्वराज्याची स्थापना केली; परंतु काही विकृत मनोवृत्तीचे लोक गलिच्छ पद्धतीने छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचा अवमान होईल, असे भाष्य किंवा कृती करतात. यामुळे कायदा व सुव्यवस्था ढासळून, समाजामध्ये दुफळी पसरते.राज्य शासनाने तज्ज्ञांशी विचारविमर्श करून, ऐतिहासिक दस्तावेजांचा योग्य अर्थ लावून, यापूर्वीच शिवछत्रपतींसह मराठा साम्राज्याचा शासनमान्य साधार इतिहास प्रसिद्ध करणे गरजेचे होते. आज विकृत प्रवृत्ती असलेली व्यक्ती चुकीच्या पद्धतीने इतिहासातील प्रसंगाचे वर्णन करून अकारण विवाद निर्माण करीत आहेत. आमच्या संयमाचा कडेलोट होण्यापूर्वी राज्य व केंद्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि एकंदरीत मराठा साम्राज्याचा इतिहास अधिकृतपणे प्रसिद्ध करावा, त्याचबरोबरीने अशा प्रवृत्तींवर कायदेशीर कारवाई करता येणारा, तसेच किमान दहा वर्षांची शिक्षा असणारा अजामीनपात्र विशेष कायदा पारित करावा. यावेळी काका धुमाळ, ॲड. विनीत पाटील, कुलदीपअण्णा क्षीरसागर, करण यादव उपस्थित होते.

निवेदनातील प्रमुख मागण्या

  • ऐतिहासिक घटनांचे चित्रपट, मालिका आदींचे चित्रीकरणापूर्वी सेन्सॉर बोर्डाला सहाय्यभूत असलेली, इतिहासकार, संशोधक आणि इतिहासतज्ज्ञांचा समावेश असलेली कमिटी स्थापन करावी, कमिटीच्या शिफारशी विचारात घेऊन सेन्सॉरशिप देण्यात यावी.
  • छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याची प्रचीती देणारे राष्ट्रीय स्मारक नवी दिल्ली येथे उभारावे.
  • छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले यांची समाधी कर्नाटक राज्यात आहे. ही समाधी व परिसराचा विकास करण्यासाठी केंद्र शासनाने भरीव निधी उपलब्ध करावा.
  • पहिल्या टप्प्यात राजगड, रायगड, अजिंक्यतारा व दुसऱ्या टप्यात राजधानी जिंजी (कर्नाटक), पानिपत, आग्रा, इंदूर, ग्वालियर, तंजावर, यासह अन्य गड-किल्ल्यांच्या विकासाचे धोरण आखावे.

शिवस्मारकाचे काम मार्गी लागावेमुंबई येथील अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाची पायाभरणी झाली आहे. तथापि अनेक वर्षे या स्मारकाला गती मिळालेली नाही. याबाबत शिवप्रेमी आणि शिवभक्तांमध्ये नाराजी व असंतोष जाणवत आहे. या स्मारकाचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेAmit Shahअमित शाह