शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

remdesivir Crime-हिंगणगावामध्येही झाली होती रेमडेसिविरची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 16:52 IST

CoronaVirus Satara : रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजारप्रकरणी अटकेत असलेल्या टोळीकडून फलटण तालुक्यात या अगोदरही इंजेक्‍शनची विक्री केल्याचे समोर आले आहे. फलटण तालुक्यातील हिंगणगाव येथे काही इंजेक्शन विकली होती. त्यातील दोन इंजेक्शन सध्या पोलिसांकडे जमा आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे.

ठळक मुद्देहिंगणगावामध्येही झाली होती रेमडेसिविरची विक्री तपास सुरूच : दोन इंजेक्शन फलटण पोलिसांकडे जमा

फलटण : रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजारप्रकरणी अटकेत असलेल्या टोळीकडून फलटण तालुक्यात या अगोदरही इंजेक्‍शनची विक्री केल्याचे समोर आले आहे. फलटण तालुक्यातील हिंगणगाव येथे काही इंजेक्शन विकली होती. त्यातील दोन इंजेक्शन सध्या पोलिसांकडे जमा आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे.फलटण शहर पोलिसांनी वृत्तपत्रामध्ये या गुन्ह्याच्या तपासकामी, कोणाची काही तक्रार असल्यास संपर्क करावा, त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन केले होते. केलेल्या आवाहनानुसार हिंगणगाव (ता. फलटण) येथील एक साक्षीदारांनी गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीकडून स्वतःचे नातेवाईक कोरोनाग्रस्त व उपचार घेत असताना मोठ्या किमतीने रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी केली होती. परंतु, संबंधित रुग्णाचे उपचारादरम्यान निधन झाल्याने, शिल्लक राहिलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या दोन बाटल्या या तपासकामी त्यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर केलेल्या आहेत.रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती फलटण पोलिसांना मिळाल्यानंतर, पोलिसांनी तातडीने सापळा रचून संबंधित सुविधा हॉस्पिटलचा कंपाउंडर सुनील कचरे (वय ३८), अजय सुरेश फडतरे (३४, व्यवसाय शेती, रा. पिंप्रद, ता. फलटण), प्रवीण दिलीप सापते (३६, रा. घाडगेवाडी, ता. फलटण) आरोपी निखिल अनिल घाडगे (३१, रा. अनपटवाडी, ता. खटाव) यांना गुन्ह्याच्या कामी अटक केली आहे.

अधिक चौकशी करता, चौकशीमध्ये आरोपी अमित विजय कुलकर्णी (वय ४५, रा. ७० बी /३, आदर्श कॉलनी, गोडोली, सातारा), रवींद्र रामचंद्र लाहोटी (वय ३२, रा. तारळे, ता. पाटण), मानसी मेडिकल तारळेचे मालक अरुण शामराव जाधव यांना अटक करण्यात आली असून, सध्या पोलीस कोठडीत आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, सहायक पोलीस निरीक्षक एस. के. राऊळ व पथक हे करीत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याremdesivirरेमडेसिवीरCrime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरphaltan-acफलटण