शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

सोबत्यांच्या वाढदिवसाला तरुणाने जोडले वृक्षांशी नाते...-- ओमकार चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 22:15 IST

सातारा : सध्या राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी गावोगावी जलसंधारण आणि वृक्षारोपणची चळवळ उभी ...

ठळक मुद्देवृक्षलागवड, संवर्धनामुळे पर्यावरणाचा ºहास थांबवून वातावरणाचा समतोल राखण्यास मदत

सातारा : सध्या राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी गावोगावी जलसंधारण आणि वृक्षारोपणची चळवळ उभी राहिली आहे. त्यामध्ये आपला खारीचा वाटा असावा, यासाठी अनेकजण आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करीत आहेत. तळिये येथील एका तरुणाने आपल्या मित्र व नातेवाइकांच्या वाढदिवसाला कोणत्याही स्वरुपाची भेट वस्तू देण्यापेक्षा रोप देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

सातारा जिल्ह्यात माण, खटाव व कोरेगाव हे तीन तालुके दुष्काळी म्हणून ओळखले जातात. कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन परिसरातील गावांमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत असतो. तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना वणवण करावी लागते.

दुष्काळ आणि पाणी टंचाई आदी प्रश्नांवर मात करण्यासाठी तळिये येथील ओमकार चव्हाण या तरुणाने ग्रामस्थांच्या मदतीने गावामध्ये जलसंधारणच्या कामांना सुरुवात केली. ते करीत असताना केवळ जलसंधारणाची कामे करून चालणार नाहीत. म्हणून पहिल्यांदा हवामान शास्त्र समजून घेतलं पाहिजे, यासाठी पर्यावरणाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. तेव्हा मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने त्याचा प्रत्यक्ष परिणाम पर्यावरणावर झाला आहे. त्याचा परिणाम पावसावर होऊन पाऊस कमी झाल्याचे उमगले.

ही समस्या सोडविण्यासाठी त्याने स्वत: वृक्ष लागवड करण्यास सुरुवात केली. लागवड केलेल्या झाडांचे संवर्धन करत असताना एकट्याला मर्यादा येत असल्याचे पाहून इतरांनाही या चळवळीत सहभागी करून घेतले. मात्र, त्यामध्ये सातत्य राहत नसल्याने त्यांनी मित्रमंडळी आणि नातेवाइकांच्या वाढदिवस तसेच शुभकार्याला भेट वस्तू न देता झाडाचे रोप दिले जाते.विद्यार्थ्यांकडून सीडबॉल निर्मितीवृक्ष लागवड आणि संवर्धनाची चळवळमध्ये समाजातील सर्व स्तरातील लोकांचा सहभाग असावा. प्रत्येक मोहिमेमध्ये शाळकरी मुलांचे मोठे योगदान असते. म्हणून अशा मुलांना सोबत घेऊन ओमकार चव्हाण उन्हाळ्यात स्थानिक झाडांच्या बिया गोळा करून सीडबॉल तयार करतात. पावसाळा सुरू झाल्यावर ते गोळे परिसरात टाकले जातात. 

पर्यावरण संवर्धनाची गरजदुष्काळ, पाणी टंचाई आणि हवामान बदल आदी प्रश्नांना तोंड देण्यासाठी पर्यावरण संवर्धन गरजेचे आहे. त्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या पद्धतीने काम केले पाहिजे. सध्या वाढलेले तापमान, कमी झालेले पावसाचे प्रमाण आदी वातावरण बदलाची लक्षणे आहेत. आपल्या पृथ्वीला वाचविण्यासाठी वृक्षलागवड केली पाहिजे. तसेच त्याचे संवर्धनही केले पाहिजे.- ओमकार चव्हाण

टॅग्स :Satara areaसातारा परिसरforestजंगल