‘सह्याद्री’पेक्षा प्रादेशिक वन हद्दीत जास्त बिबटे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:27 AM2019-11-21T00:27:21+5:302019-11-21T00:27:26+5:30

संजय पाटील । कºहाड : श्वापदांची मोजदाद ‘वन्यजीव’च्या हद्दीत होते; पण ‘प्रादेशिक वन’हद्दीत अशी गणना होत नाही. किती अन् ...

Regional forest boundaries more than 'Sahyadri'! | ‘सह्याद्री’पेक्षा प्रादेशिक वन हद्दीत जास्त बिबटे!

‘सह्याद्री’पेक्षा प्रादेशिक वन हद्दीत जास्त बिबटे!

Next

संजय पाटील ।
कºहाड : श्वापदांची मोजदाद ‘वन्यजीव’च्या हद्दीत होते; पण ‘प्रादेशिक वन’हद्दीत अशी गणना होत नाही. किती अन् कुठे प्राणी वावरतायत, हेच या विभागाला माहिती नसतं. बिबट्याचंही
असंच झालंय. त्यांची संख्या किती, हेच निश्चित नाही. मात्र, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जेवढे बिबट्या वावरतायत, त्यापेक्षा जास्त संख्येत ते प्रादेशिक हद्दीत वावरत असल्याचा निष्कर्ष प्राणी अभ्यासकांनी काढलाय.
प्रादेशिक वन विभागाचे क्षेत्र गावोगावी डोंगररांगांमध्ये विखुरले गेले आहे. त्यामुळे या क्षेत्रात वावरणाऱ्या प्राण्यांचा मागमुस काढणे कठीण. मात्र, प्राण्यांची जेवढी विविधता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळून येते, त्याचपटीत कमी-जास्त प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी डोंगर रांगांमध्ये वावरत असल्याचे प्राणी अभ्यासकांचे मत आहे.
कºहाड व पाटण तालुक्यातील वाढत्या बिबट्याप्रवण क्षेत्राचा विचार करता प्रादेशिक हद्दीत सह्याद्री प्रकल्पापेक्षा जास्त बिबट्या वावरत असल्याचे मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे सांगतात.
‘गत काही वर्षांत बिबट्याप्रवण क्षेत्र कमालीचं वाढलंय. वारंवार हल्लेही होतायत. ज्याठिकाणी पूर्वी कधी मागमुस नव्हता, त्याठिकाणीही सध्या बिबट्या दिसतोय. हा प्राणी चोवीस तासांत सुमारे चौदा चौरस किलोमीटर क्षेत्रात फिरतो. सध्याचे बीटनिहाय बिबट्याप्रवण क्षेत्र तपासले तर प्रत्येक बीटमध्ये किमान दोन ते तीन बिबट्या असावेत आणि त्यांची एकूण संख्या सह्याद्री प्रकल्पातील संख्येपेक्षा जास्त असावी,’ असा निष्कर्ष असल्याचे रोहन भाटे म्हणाले. तर मध्यंतरी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात कºहाड आणि पाटण तालुक्याच्या प्रादेशिक वनहद्दीत सुमारे शंभर बिबट्यांचा वावर असल्याचे समोर आले होते, असे प्राणी अभ्यासक नाना खामकर यांनी सांगितले.
‘जंगल हा अधिवासच बिबट्या विसरलेत. उसाचे शेत हेच जंगल असल्याचा अनुवंशिक बदल त्यांच्यामध्ये झाल्याचे दिसून येते. प्रादेशिक वनहद्दीत म्हणजेच कोयना आणि चांदोली अभयारण्य वगळता कºहाड, पाटण तालुक्यांतील इतर प्रदेशात शंभरपेक्षा जास्त बिबटे असावेत,’ असे खामकर सांगतात.
प्रादेशिक वन विभागाचे क्षेत्र
राखीव क्षेत्र :
१२,५८५.५७ हेक्टर
अवर्गित क्षेत्र :
१४.६५ हेक्टर
संपादित क्षेत्र :
५५३.६७ हेक्टर
एकूण क्षेत्र :
१३,१५३.७९ हेक्टर
कºहाडचे बिबट्याप्रवण क्षेत्र (हेक्टरमध्ये)
मलकापूर : ७७०.०४
नांदगाव : ७२८.१९
कोळे : १०३९.४२
कासारशिरंबे : ५८५.११०
तांबवे : ९००.९२
म्हासोली : ८३२.५२
वराडे : १२८४.४००
म्होप्रे : ९१६.१८०
100
पेक्षा जास्त बिबट्ये
प्रादेशिक वनहद्दीत असावेत असे अभ्यासक सांगतात.
44
व्याघ्र प्रकल्पात
एकूण बिबट्या

Web Title: Regional forest boundaries more than 'Sahyadri'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.