शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दूध खरेदीचा दर कमी केल्याने बळीराजा अडचणीत, खर्च अन् उत्पन्नाचा बसेना ताळमेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 12:46 IST

शासनाने दूध खरेदीचा दर दोन रुपयांनी कमी केला असल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. दूध डेअरीवर सरासरी केवळ २० ते २२ रुपये प्रतिलिटर दर मिळत आहे. त्यामुळे खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळ घालण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.

ठळक मुद्दे होणारा खर्च, मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ घालण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत

खंडाळा ,दि. ११ : : शासनाने दूध खरेदीचा दर दोन रुपयांनी कमी केला असल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. दूध डेअरीवर सरासरी केवळ २० ते २२ रुपये प्रतिलिटर दर मिळत आहे. त्यामुळे जनावरांच्या पालनावर होणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ घालण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. तर खासगी दूध संकलकांना पदरमोड करून जादा दर द्यावा लागत असल्याने तेही मेटाकुटीला आले आहेत.

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. मात्र, एकीकडे शेती पिकांना हमीभाव नाही तर दुसरीकडे दूध दर कमी झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

शेतकऱ्यांना वार्षिक खर्चाचा ताळमेळ बसवताना महिनावार घरखर्चासाठी दुधाच्या पगारावर अवलंबून राहावे लागते. जनावरांचा चारा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या कडबा २००० ते ३००० रुपये प्रती शेकडा, गोळी पेंड पोत्यास १५०० रुपये, शेंगदाणा पेंड प्रती क्विंटल ५००० रुपये, ओली मका २००० रुपये प्रती गुंठा असे चाऱ्याचे दर आहेत. त्यामुळे पशुपालनासाठी खाद्यावर मोठा खर्च होत आहे.

दुधाचे दर मात्र कमी झाले आहेत. खासगी दूध विक्रीतून प्रती लिटर ४० रुपये दर मिळत असताना डेअरीवर मात्र निम्माच दर मिळत आहे. त्यातही खासगी संकलन केंद्र व शासकीय संकलन केंद्र यामध्येही तफावत आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना संतुष्ट ठेवण्यासाठी डेअरी चालकांना पदरमोड करावी लागत आहे. या सर्वच धोरणांमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. 

गायीपालनासाठी खर्चात काटकसर करून चालत नाही. योग्य निगा राखावी लागते . चाऱ्यासह औषधांचाही खर्च असतो. या परिस्थितीत दुधाचे दर कमी करणे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्यासारखे आहे. शासनाने शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून योजना राबविली पाहिजे. मात्र, तसे घडत नाही.-नवनाथ ससाणे,दूध उत्पादक

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार