कऱ्हाड : कोपर्डे हवेली, ता. कऱ्हाड येथे पूर्ण वेळ तलाठी मिळण्याची मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली होती. महसूल विभागाने याचा विचार करून दादाराम कणसे यांची त्या ठिकाणी नेमणूक केली असून ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण, माजी उपसरपंच लालासाहेब चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष शैलेश चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील, नानासाहेब चव्हाण, दादासाहेब चव्हाण, शिवाजी चव्हाण, भरत चव्हाण, के.बी. चव्हाण, संजय चव्हाण, अमर चव्हाण, शुभम चव्हाण, अलंकार चव्हाण, रमेश तुपे, संजय चव्हाण, किशोर साळवे, आबा बुधे उपस्थित होते.
भाग्यलक्ष्मी संस्थेतर्फे पूरग्रस्तांना वस्तूंचे वाटप
कऱ्हाड : बेलवडे बुद्रुक, ता. कऱ्हाड येथील भाग्यलक्ष्मी महिला बहुउद्देशीय संस्था व भाग्यलक्ष्मी महिला बचत गटाद्वारे कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतवडे खुर्द गावातील पूरग्रस्त व नुकसानग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मीताई मोहिते, कोमल मोहिते, कल्पना मोहिते, वनिता मोहिते, सुनीता वाघमारे, जयश्री बनसोडे, दामिनी पावणे आदी यावेळी उपस्थित होत्या. पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत पोहोचवताना कर्तव्य व सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून बचत गटाच्या महिलांनी ही मदत पोहोचविल्याचे अध्यक्ष लक्ष्मीताई मोहिते यांनी सांगितले.