शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

Sharad Pawar: 'रयत'चे विद्यापीठ जूनपासून सुरू होणार, शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 18:32 IST

सातारा : रयतचं स्वत:चं विद्यापीठ असावं, हे आपणा सर्वांचं स्वप्न होतं. त्याचा पाठपुरावा सुरू होता. त्याला केंद्र व राज्य ...

सातारा : रयतचं स्वत:चं विद्यापीठ असावं, हे आपणा सर्वांचं स्वप्न होतं. त्याचा पाठपुरावा सुरू होता. त्याला केंद्र व राज्य शासनाची परवानगी मिळाली आहे. आवश्यक त्या बाबींची पूर्तता झाल्यानंतर येत्या जूनपासून पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सुरू करू शकू, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६३ व्या स्मृतिदिनानिमित्त सातारा येथे त्यांच्या समाधीस्थळावर संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, संस्थेचे चेअरमन डॉ अनिल पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, मंत्री विश्वजित कदम, खासदार सुप्रिया सुळे, रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, शशिकांत शिंदे, प्रभाकर देशमुख आदींनी कर्मवीर अण्णांच्या समाधीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर संस्थेच्या प्रांगणात झालेल्या समारंभात शरद पवार बोलत होते.पवार म्हणाले, ‘दोन वर्षांनंतर हा समारंभ होत आहे. आज या समारंभाला न चुकता हजेरी लावणारे डॉ. एन. डी. पाटील, आमदार गणपतराव देशमुख, शंकरराव कोल्हे आज नाहीत. त्यामुळे मी अस्वस्थ आहे. संस्थेचा मोठा कार्यविस्तार झाला आहे. कर्मवीर अण्णांनी ग्रामीण भागात शिक्षणाचं जे रोपटं लावलं त्याचं वटवृक्षात रूपांतर झालंय. बदलत्या काळाचे आधुनिक तंत्रज्ञान मुलांपर्यंत पोहोचतेय. त्यात ‘रयत’चा वाटा मोठा आहे, याचा मला अभिमान आहे.’कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेला २५ लाखांपेक्षा जास्त देणगी देणारे देणगीदार, संस्थेचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील निवड झालेले अधिकारी विद्यार्थी, राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक, विद्यापीठ गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळविणारे विद्यार्थी व कर्मवीर पारितोषिक मिळविलेले मान्यवर यांचा सन्मान खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला.मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुरस्काराच्या रकमेत स्वत:ची भर घालून २५ लाख रुपयांची देणगी संस्थेला दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले, तर संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे आजी-माजी सेवक, पदाधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSharad Pawarशरद पवार