शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : आंबेनळी अपघातातील त्या मृतांचे साहित्य नातेवाईकांना परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 15:25 IST

दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या ३० कर्मचाऱ्यांचा २८ जुलै २०१८ रोजी महाबळेश्वर - पोलादपूर आंबेनळी घाटात खोल दरीत बस कोसळून मृत्यू झाला होता. अपघातस्थळी त्या ३० कर्मचाऱ्यांचे सापडलेले साहित्य पोलादपूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक तथा या घटनेचे तपासिक अंमलदार प्रकाश पवार यांनी मृतांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केले.

ठळक मुद्देआंबेनळी अपघातातील त्या मृतांचे साहित्य नातेवाईकांना परतसाहित्य घेताना अनेकांचे अश्रू दाटले, दापोली कृषी विद्यापीठात उपस्थिती

दापोली : दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या ३० कर्मचाऱ्यांचा २८ जुलै २०१८ रोजी महाबळेश्वर - पोलादपूर आंबेनळी घाटात खोल दरीत बस कोसळून मृत्यू झाला होता. अपघातस्थळी त्या ३० कर्मचाऱ्यांचे सापडलेले साहित्य पोलादपूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक तथा या घटनेचे तपासिक अंमलदार प्रकाश पवार यांनी मृतांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केले.मोबाईल, बॅग, घड्याळ, एटीएम कार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सोन्याचे दागिने, रोख रक्कम आढळली होती. पंचनाम्यादरम्यान वस्तूंची ओळख पटवून त्यांची यादी तयार करण्यात आली होती. ही यादी पूर्ण झाल्यानंतर गुरुवार, १६ आॅगस्ट रोजी सायंकाळी मृत कर्मचाऱ्यांचे साहित्य, पंचनामे, शवविच्छेदन अहवालाची प्रत नातेवाईकांना देण्यात आली.तपासिक अंमलदार पवार दापोलीत आले होते. दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे प्रशासकीय इमारतीत मृतांच्या पत्नी व नातेवाईकांना बोलावण्यात आले होते. काही पालक विद्यापीठात पोहोचू शकली नाहीत. अशा कर्मचाºयांच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन वस्तू देण्यात आल्या आहेत. काही मोबाईलच्या माध्यमातून या अपघाताचे गूढ उकलण्याची शक्यता आहे.अपघातस्थळावरून सापडलेल्या काही वस्तू नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. परंतु, सोन्याचे काही दागिने गायब झाले असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. या वस्तूंचाही शोध सुरू आहे. नेमका अपघात कशामुळे झाला व गाडी कोण चालवत होते. याचे गूढ कायम असून, याबाबत तपास सुरु आहे.वस्तू पाहताच आठवणी दाटल्याकर्मचाऱ्यांचे साहित्य घेताना अनेकांनी अश्रूला वाट मोकळी करून दिली. आई, वडील, पत्नी, भाऊ, बहीण जवळच्या नातेवाईकांना बोलावण्यात आले होते. त्या कर्मचाऱ्यांच्या पत्नीने जड अंत:करणाने घटनास्थळी सापडलेल्या वस्तू ताब्यात घेतल्या. परंतु, या वस्तूमुळे आठवणी ताज्या होऊन अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.घड्याळांची टिक टिक थांबली...घड्याळांची टिक टिक ११ वाजून १७ मिनिटांनी किंवा ११ वाजून १६ मिनिटांनीच बंद पडल्याचे तपासादरम्याने सापडलेल्या घड्याळांवरून दिसत आहे. तपासादरम्याने सापडलेली ही घड्याळे सव्वा अकरानंतर बंद पडल्यामुळे अपघात अंदाजे ११ वाजल्यानंतर झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.अजूनही दु:खाचे सावट कायमआंबेनळी दुर्घटनेला २१ दिवस उलटून गेले असून, मृत कर्मचाऱ्यांची कुटुंब अजूनही धक्क्यातून सावरलेली नाहीत. दापोलीवर अजूनही दु:खाचे सावट असून, या धक्क्यातून ना विद्यापीठ सावरले ना दापोलीकर! परंतु, दापोलीकरांप्रमाणेच विद्यापीठानेही मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. 

टॅग्स :Satara Bus Accidentसातारा बस अपघातRatnagiriरत्नागिरीDapoli Police Thaneदापोली पोलीस ठाणे