शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘आई उदे गं अंबे उदेऽऽ’च्या जयघोषाने औंधनगरी दणाणली!, श्री यमाईदेवीचा रथोत्सव उत्साहात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 17:46 IST

रशिद शेख औंध : महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या औंध येथील श्री यमाईदेवीचा रथोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत ...

रशिद शेखऔंध : महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या औंध येथील श्री यमाईदेवीचा रथोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात पार पडला. भाविकांनी ‘आई उदे गं अंबे उदेऽऽ’च्या जयघोषाने औंधनगरी दणाणून सोडली.     शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा लाभलेल्या औंधच्या श्री यमाईदेवी रथोत्सवास शनिवारी दुपारी सव्वाबारा वाजता प्रारंभ झाला. श्री यमाई देवस्थानच्या मुख्य विश्वस्त गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत व राजकन्या हर्षिताराजे यांच्या हस्ते ग्रामनिवासिनी श्री यमाईदेवी मंदिरात श्री यमाईदेवीच्या उत्सवमूर्तीचे विधिवत षोडषोपचारे पूजन करण्यात आले. देवीची उत्थापना करून देवीची उत्सवमूर्ती सभामंडपात राजकन्या हर्षिताराजे यांच्या हस्ते आणण्यात आली. यावेळी ब्राम्हणवृंदानी पौरोहित्य व मंत्रपठन केले.       यावेळी दूध, दही, पुष्प अर्पण करून देवीची पूजा करण्यात आली. त्यानंतर देवीची चौपाळ्याजवळ प्रतिष्ठापना करण्यात आली. त्याठिकाणी मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते विधिवत देवीचे पूजन करण्यात आले. ऐतिहासिक परंपरेनुसार सलामी देऊन हर्षिताराजे यांच्या हस्ते देवीची पालखीत प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर पालखीचे मानकरी भोई यांनी वाद्यवृंदाच्या गजरात पालखी रथापर्यंत नेली. त्याठिकाणी देवीची ऐतिहासिक दुमजली रथात प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, हर्षिताराजे, जितेंद्र पवार, मठाधिपती सुंदरगिरी महाराज, नंदकुमार मोरे, अर्जुन खाडे, विजय खाडे, शिक्षक बँकेचे चेअरमन नवनाथ जाधव, माजी सभापती संदीप मांडवे, सरपंच सोनाली मिठारी, उपसरपंच दीपक नलवडे, हणमंत शिंदे उपस्थित होते.  देवीच्या जयघोषात रथोत्सवास उत्साही वातावरणात सुरुवात झाली. रथाचे मानकरी माळी, भाविक, ग्रामस्थांनी रथ ओढून मिरवणुकीस प्रारंभ केला. यावेळी राज्यासह परराज्यातून आलेल्या भाविकांनी श्रीयमाईदेवीचे दर्शन घेऊन रथावर एक रुपयापासून ते दहा हजार रुपयांपर्यंतच्या नोटांची माळ, नारळाची तोरणे, फुलांच्या माळा, गुलाल, खोबरे अर्पण केले. ‘आई उदे गं अंबे उदे’चा जयघोष केला. रथाच्या अग्रभागी तेलभुते, डवरी, सनईवाले, गोंधळी, दांडपट्टेवाले, आराधी, घडशी, पुजारी, भोई, माळी या देवीच्या सेवेकऱ्यांनी वेगवेगळ्या पेहरावात देवीचरणी सेवा, कला सादर केली. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसर