शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील आदर्कीत ‘भैरवनाथाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात रथोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 17:19 IST

तालुक्याबरोबर जिल्हा व जिल्हा बाहेरून भाविक, चाकरमान्यांनी रथासाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. त्यामुळे आदर्की बुद्रुक येथे भक्तिमय वातावरण तयार झाले होते.

आदर्की : फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण, ढोल-ताशा, तुतारी, गजनृत्य करत भैरवनाथाचा जयघोष करीत आदर्कीच्या ‘भैरवनाथाच्या नावानं चांगभलं’ म्हणत रथोत्सव साजरा करण्यात आला.आदर्की बुद्रुक येथे श्री भैरवनाथ जयंती सोहळा व रथोत्सवानिमित्त अभिषेक, होमहवन, काकड आरती, भजन, कीर्तन, व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री भैरवनाथाची मूर्ती पाळण्यात ठेवली व महिलांनी स्वरचित भैरवनाथाचा पाळणा म्हणत भैरवनाथ जन्म सोहळा पार पडला. त्यानंतर सुंठवडा वाटप करण्यात आले. दुपारी तीन वाजता फुलाने सजवलेला व विद्युत रोषणाई केलेल्या रथामध्ये श्री भैरवनाथ-जोगेश्वरी यांच्या मूर्ती ठेवून रथाचे पूजन केले. ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या नवीन ट्रॅक्टरद्वारे रथ ग्रामप्रदक्षिणासाठी सुरुवात झाली. यावेळी ग्रामस्थ, महिला भाविकांनी गर्दी केली होती.रथापुढे गजनृत्य, ढोल-ताशा, तुतारी, फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत रथ मार्गस्थ होताना प्रत्येक घरापुढे महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढून फुलांचा सडा टाकला होता. प्रत्येक घरातील महिला, पुरुष, बाळगोपाळ रथाचे मनोभावे दर्शन घेत होते. रथ भैरवनाथ मंदिर चौक, तिकाटणे, विश्वासराव धुमाळ घर, विठ्ठल मंदिर, मठ, फलटण-सातारा रस्ता येथून मारुती मंदिर अशी ग्रामप्रदक्षिणा घालून मंदिरात आला. त्या ठिकाणी महाआरती होऊन रथाची सांगता झाली.रथोत्सवामध्ये खेळणी, हॉटेल, मिठाईची दुकाने थाटली होती. तालुक्याबरोबर जिल्हा व जिल्हा बाहेरून भाविक, चाकरमान्यांनी रथासाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. त्यामुळे आदर्की बुद्रुक येथे भक्तिमय वातावरण तयार झाले होते. रथोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी रथोत्सव कमिटी, ग्रामस्थ, तरुण मंडळ, पोलीस प्रशासन यांनी परिश्रम घेतले.आदर्की बुद्रुक येथील रथोत्सवावर भाविकांनी ३७ हजार रुपयांचे तोरण बांधले होते. ग्रामस्थांनी भाविकांची भोजनाची व्यवस्था केली होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर