शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Satara: विंगमध्ये आढळली दुर्मिळ धुळनागीण, सर्पमित्रांनी ताब्यात घेवून नैसर्गिक अधिवासात सोडले

By संजय पाटील | Updated: May 28, 2025 16:23 IST

संजय पाटील कऱ्हाड : विंग-वेताळवाडी, ता. कऱ्हाड येथे बुधवारी दुपारी एका घरानजीक दुर्मीळ धुळनागीण जातीचा सर्प आढळून आला. सर्पमित्रांनी ...

संजय पाटील

कऱ्हाड : विंग-वेताळवाडी, ता. कऱ्हाड येथे बुधवारी दुपारी एका घरानजीक दुर्मीळ धुळनागीण जातीचा सर्प आढळून आला. सर्पमित्रांनी त्या ठिकाणी धाव घेत तयाला ताब्यात घेतले. तसेच त्याला सुरक्षितरीत्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.विंग-वेताळवाडी येथील पोपट शंकर नलवडे हे त्यांच्या घरानजीक काम करीत होते. त्यावेळी त्यांना हा साप दिसला. त्यांनी कऱ्हाडमधील वाइल्डहार्ट रेस्क्यू या संस्थेचे सदस्य असलेल्या मलकापूर येथील विशाल साठे यांना ही माहिती दिली. साठे यांनी घटनास्थळावरुन हा सर्प सुरक्षितरीत्या पकडला. संबंधित सर्प बिनविषारी धुळनागीण असल्याचे विशाल साठे यांच्या निदर्शनास आले. या सर्पाचा रंग नागासारखा तपकिरी असतो. तसेच अंगावर खवले असतात. या जातीचा सर्प कऱ्हाडमध्ये पहिल्यांदाच ‘रेस्क्यू’ करण्यात आला आहे. यापूर्वी ठिकठिकाणी धुळनागीण दिसून येत होती. मात्र, त्याला पकडण्यात आले नव्हते.धुळनागीण हा सर्प डोंगराळ भाग, गवताळ प्रदेशात आढळतो. सध्या या सर्पांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. शेतीमध्ये केली जाणारी औषध फवारणी, रासायनिक खतांचा वापर यांमुळे हे साप दुर्मीळ झाले आहेत.विंग येथे पकडलेला हा सर्प हे नुकतेच जन्मलेले पिल्लू होते. पूर्ण वाढ झाल्यानंतर हा साप हुबेहूब नागासारखा दिसतो. भुसभुशीत मातीमध्ये त्याचे वास्तव्य असते. सापसुरळी, बेडूक व दगडांच्या खाचीमध्ये राहणारे प्राणी हे त्याचे खाद्य असल्याचे विशाल साठे यांनी सांगितले.

पिकांवर होणारी औषधफवारणी, रासायनिक खतांचा वापर तसेच दगडखाणींमुळे हा सर्प दुर्मीळ होत चालला आहे. या सर्पाला वन्यजीव कायद्यान्वये संरक्षण आहे. - योगेश शिंगण, सर्पमित्र, प्राणी अभ्यासक, कऱ्हाड

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडsnakeसाप