शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पावसाळा तोंडावर; आपत्ती कक्षांना बुस्टर डोसची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 12:19 IST

सातारा जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांच्या विभाग प्रमुखांना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्याबाबत महिनाभरापूर्वी बैठक घेऊन सूचना केल्या आहेत. तरीदेखील बहुतांश शासकीय कार्यालयांमधील कक्ष डुलक्या खात आहेत. या कक्षांना बुस्टर डोस दिला नाही तर लोकांवर मोठी आपत्ती येऊ शकते.

ठळक मुद्देपावसाळा तोंडावर; आपत्ती कक्षांना बुस्टर डोसची गरज!विभागांतील दूरध्वनी अद्यापही नॉट इन सर्व्हिस

सातारा : जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांच्या विभाग प्रमुखांना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्याबाबत महिनाभरापूर्वी बैठक घेऊन सूचना केल्या आहेत. तरीदेखील बहुतांश शासकीय कार्यालयांमधील कक्ष डुलक्या खात आहेत. या कक्षांना बुस्टर डोस दिला नाही तर लोकांवर मोठी आपत्ती येऊ शकते.पाटबंधारे विभागातील वायरलेस विभागातील दूरध्वनी अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल आहे. धरणक्षेत्रात पावसाचा हाहाकार सुरू झाल्यास धरणांमधून पाणी सोडावे लागणार आहे. त्याआधी धरण व नदीकाठच्या स्थानिक जनतेला सूचना कराव्या लागतात. काही प्रश्न असल्यास लोकांनी या विभागात दूरध्वनी करायचा झाल्यास येथील दोन्ही फोन बंद आहेत.

दूरध्वनी दुरुस्त करण्यासंदर्भात हालचाली होताना दिसत नाहीत. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षातील दूरध्वनीही उचलला जात नाही. साहजिकच आपत्ती कोसळल्यानंतर दाद कुणाकडे मागायची? हा प्रश्न लोकांना सतावू लागला आहे.सातारा तालुक्यातील धावडशी या गावात गेल्या चार दिवसांपासून वीज गायब आहे. वीज दुरुस्ती झाली नसल्याने गावात पिण्याच्या पाण्याची ओरड झाली आहे. वादळी वाऱ्याने खांब पडल्याने ही दुरुस्ती सुरू असल्याचे वीज विभागाने स्पष्ट केले असले तरी चार-चार दिवस एखाद्या गावात वीजच नसणे, ही किती त्रासदायक बाब आहे, हे अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावे व वीज आली नाही तर वीज कार्यालयावर हंडा मोर्चा काढला जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी ९ मे रोजी पाटबंधारे, पोलीस, नगरपालिका, एसटी महामंडळ, वीज विभाग, जिल्हा परिषद आदी विभागांची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये आपापल्या कार्यालयात आपत्ती निवारण कक्ष सुरू करण्याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या; परंतु अद्यापही असे विभाग सुरू झाले नसल्याचे चित्र आहे.

पाटबंधारे विभागाने धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याबाबत कळवावे. अतिक्रमणे काढावीत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या, त्याबाबत कार्यवाही झालेली नाही. नगरपालिकांमध्ये २४ तास कार्यरत असणारा कक्ष सुरू करण्याबाबतही सूचना केल्या आहेत. सर्व विभागांनी कागदी घोडे नाचवत सूचना करण्याचे सोपस्कार पूर्ण केले असले तरी सतर्कता कुठेही पाहायला मिळत नाही.दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने कऱ्हाड, वाई, पाटण, जावळी, महाबळेश्वर या तालुक्यांना दोन रबर बोट, लाईफ जॅकेट, फायबरच्या रिंग, सर्च लाईट, मेगाफोन, फ्लोटिंग पंप वितरित करण्यात आले आहे. पावसाळ्यात आपत्ती निवारणाच्या अनुषंगाने स्थानिक लोकप्रतिनिधी, तलाठी, महिला, ग्रामसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.झाडाखालील आश्रय ठरू शकतो जीवघेणामान्सून पूर्व पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जागोजागी विजा चमकताना दिसत आहेत. पाऊस सुरू असताना झाडाच्या आश्रयाला थांबणे धोकादायक ठरणार आहे. पावसाळ्यात मोबाईलचा वापर टाळावा, अशा सूचना केल्या आहेत.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSatara areaसातारा परिसर