शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात पश्चिम भागात पाऊस; नवजा, महाबळेश्वरला हजेरी

By दीपक शिंदे | Updated: June 16, 2023 12:16 IST

पूर्व भागात वरुणराजाची प्रतीक्षा

सातारा : जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस दाखल झाला असून पश्चिमेकडील कोयना, नवजा, महाबळेश्वरलाच दररोज हजेरी लागत आहे. मात्र, दुष्काळी भागात अजूनही वरुणराजाची प्रतीक्षा आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला ५३ तर महाबळेश्वरला ७७ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. कोयना धरणात ११.९२ टीएमसी साठा राहिला आहे.जिल्ह्यात यावर्षी उन्हाळ्यात वळवाचे पाऊस कमी झाले. तर मान्सूनचा पाऊसही उशिरा दाखल झाला. आता जून महिना मध्यावर आला तरी मान्सूनच्या पावसाचा जोर नाही. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. गेल्या काही दिवसांत पश्चिम भागातील कोयना, नवजा, कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर या भागात पाऊस पडत आहे. पण, या पावसातही जोर नाही. गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत काेयनेला १३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर नवजा येथे ८ आणि महाबळेश्वरला २ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. एक जूनपासून आतापर्यंत कोयना व नवजा येथे प्रत्येकी ५३ मिलिमीटर पाऊस झाला. तर महाबळेश्वरला ७७ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

जिल्ह्याच्या पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव तसेच खंडाळा, वाईसह कऱ्हाड तालुक्यातही पाऊस नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीवर परिणाम झाला आहे. पेरणीसाठी पुरेसा पाऊस होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. त्यातच कृषी विभागाने ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस किंवा जमिनीत ४ ते ६ इंच ओल झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे आवाहन केलेले आहे.

कोयनेतून विसर्ग सुरूच...कोयना धरणात यंदा गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा राहिलेला आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास धरणात ११.९२ टीएमसी साठा होता. याचा अर्थ धरणात ११.३२ टक्के साठा राहिला आहे. त्यातच धरणाच्या पायथा वीजगृहातून १०५० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. तर जिल्ह्यातील कण्हेर, उरमोडी, धोम, बलकवडी, तारळी या प्रमुख धरणांतीलही पाणीसाठा खालावला आहे. पाऊस नसल्याने कोणत्याच धरणात पाण्याची आवक सुरू नाही. तर सिंचनासाठी मागणी असल्याने धरणांतून पाणी सोडले जात आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान