शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरचा पाऊस एक हजारी, सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर कमी 

By नितीन काळेल | Updated: July 5, 2023 12:36 IST

कोयना धरणातून होणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी महाबळेश्वरच्या पर्जन्यमानाने एक हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला आहे. नवजा येथेही आतापर्यंत ८७३ मिलीमीटरची नोंद झालेली आहे. तर कोयना धरणातील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत असून बुधवारी सकाळी १५.७६ टीएमसी झाला होता.जिल्ह्यात २५ जूनपासून मान्सूनचा पाऊस सक्रिय झाला. त्यावेळी पूर्व आणि पश्चिम भागात एकाचवेळी पावसाला सुरुवात झाली. पण, पूर्व भागात अवघ्या तीन दिवसांत पावसाने उघडीप दिली. तर पश्चिम भागात जोर धरला होता. मागील आठ दिवस कोयनेसह नवजा, कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वरला दमदार पाऊस झाला. यामुळे ओढे, नाले खळाळू लागले आहेत. तसेच पावसामुळे कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी सारख्या प्रमुख धरणांतील पाणीसाठाही हळूहळू वाढू लागला. त्यामुळे पाऊस सुरू झाल्यानंतर कोयना धरणात जवळपास पाच टीएमसी पाणीसाठा वाढलेला आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे अवघा १० मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. तर नवजा येथे २२ आणि महाबळेश्वरला २५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर एक जूनपासूनचा विचार करता आतापर्यंत कोयनानगरला ६१४, नवजा येथे ८७३ मिलीमीटरची नोंद झालेली आहे. तर महाबळेश्वरला १,०११ मिलीमीटर पाऊस पडला आहे.बुधवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात ५ हजार ८६१ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणात १५.७६ टीएमसी पाणीसाठा झाला होता. पाऊस कमी झाल्याने धरणातील आवकवरही परिणाम झालेला आहे. तर तीन दिवसांपासून धरणातून होणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे.साताऱ्यात ढगाळ वातावरण...सातारा शहरात बुधवारी सकाळी पाऊस झाला नाही. मात्र, दुपारपर्यंत ढगाळ वातावरण कायम होते. त्यानंतर पावसाचा काही भागात शिडकावा झाला. मात्र, मागील आठ दिवसांत साताऱ्यात बुधवारी प्रथमच पावसाचे प्रमाण एकदम कमी झाल्याचे दिसून आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानKoyana Damकोयना धरण