शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कोयना धरणक्षेत्रात पावसाची हजेरी, महाबळेश्वरला सर्वाधिक पाऊस

By नितीन काळेल | Updated: September 8, 2023 16:29 IST

पावसाचे प्रमाण कमीच

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाला सुरुवात झाली असून कोयना धरणक्षेत्रात १० दिवसानंतर हजेरी लावली. तर महाबळेश्वरला सर्वाधिक ४७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, कोयना धरणात ८५ टीएमसीवर पाणीसाठा आहे.जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यातच मान्सूनचा पाऊसही जिल्ह्यात उशिरा सुरु झाला. जून महिन्याच्या उत्तरार्धात सुरु झालेला पाऊस जुलैच्या पहिल्या १५ दिवसांपर्यंत पडत होता. पश्चिम भागातच पडणाऱ्या या पावसामुळे धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, कोयनेसह उरमोडी धरणात पाणीसाठा वाढला. याचदरम्यान, पूर्व दुष्काळी भागात मात्र पावसाची उघडीप होती. असे असतानाच जुलैच्या उत्तरार्धानंतर पाऊस कमी झाला. आॅगस्ट महिन्यात तर पावसाची मोठी दडी होती. यामुळे प्रमुख मोठे पाणीप्रकल्प अजुन भरलेले नाहीत. आतातर सप्टेंबर सुरु असूनही पावसाचे प्रमाण कमीच आहे.जिल्ह्याच्या पूर्व दुष्काळी भागात काही ठिकाणी पाऊस झाला आहे. पण, पूर्वेकडे गुरुवारपासून पावसास सुरुवात झाली. यामुळे १० दिवसांनंतर पाऊस पडला आहे. तसेच प्रमुख धरणक्षेत्रातही पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे २३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर नवजा येथे ३७ आणि महाबळेश्वरला ४७ मिलीमीटर पाऊस पडलेला आहे.

एक जूनपासूनचा विचार करता सर्वाधिक पाऊस नवजा येथे ५०८८ मिलीमीटर झालेला आहे. तर कोयनानगर येथे सर्वात कमी ३५५४ आणि महाबळेश्वरला ४७९४ मिलीमीटर पडला आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात ३२०४ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणसाठा ८५.३७ टीएमसी झाला होता. धरणाच्या पायथा वीजगृहातून १०५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरणMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान