शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

नवजाचा पाऊस पाच हजार मिलिमीटरकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 15:28 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरुपात पाऊस पडत असून मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला २६ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना आणि नवजाला काहीच पाऊस झाला नाही. दरम्यान, नवजाच्या पावसाने पाच हजार मिलिमीटरकडे वाटचाल सुरू केली असून कोयना धरणसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे.

ठळक मुद्देनवजाचा पाऊस पाच हजार मिलिमीटरकडे तुरळक पाऊस : कोयना धरण साठ्यात हळू हळू वाढ

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरुपात पाऊस पडत असून मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला २६ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना आणि नवजाला काहीच पाऊस झाला नाही. दरम्यान, नवजाच्या पावसाने पाच हजार मिलिमीटरकडे वाटचाल सुरू केली असून कोयना धरणसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे.जिल्ह्यात यावर्षी मान्सूनचा पाऊस वेळेत दाखल झाला असलातरी त्याचे प्रमाण अनिश्चित राहिले आहे. जून महिन्यात चांगला पाऊस झाला. पण, जुलैमध्ये प्रमाण कमी राहिले होते. तर आॅगस्ट महिन्यात दमदार पाऊस कोसळला. विशेष करुन पश्चिम भागात काही दिवस मुसळधार पाऊस झाला.

तसेच कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, धोम, बलकवडी या धरण परिसरातही पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे काही दिवसांतच धरणांमधील साठा वेगाने वाढला. परिणामी धरणे भरु लागल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू करावा लागला. सध्या सर्वच धरणे भरु लागली आहेत. तर तारळी धरण १०० टक्के भरले आहे.मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरलाच २६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर यावर्षी आतापर्यंत महाबळेश्वरला ४७७३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्याचबरोबर कोयनेला आतापर्यंत ४१९६ आणि नवजा येथे ४८०९ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे.

कोयना धरणात हळू हळू पाण्याची आवक होत आहे. धरणात १०३.१९ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद आहे. दरम्यान, सातारा शहराबरोबरच दुष्काळी तालुक्यातही पावसाची उघडीप आहे. 

टॅग्स :RainपाऊसMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानSatara areaसातारा परिसर