शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

जिल्ह्यात पावसाचा जोर कमी, कोयना वीजगृहातून विसर्ग सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 14:18 IST

Rain Satara : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात १५ दिवसांपूर्वी धुवाँधार पडणाऱ्या पावसाचा जोर सध्या कमी झाला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत कोयनेला ६४, नवजा ८१ तर महाबळेश्वरला ७६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयनेतील साठा ८७ टीएमसीवर असून पायथा वीजगृहातून विसर्ग सुरूच आहे. तसेच जिल्ह्यातील इतर काही धरणांतूनही पाणी सोडण्यात येत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात पावसाचा जोर कमी, कोयना वीजगृहातून विसर्ग सुरूचनवजाला ८१, महाबळेश्वरला ७६ मिलीमीटर पाऊस

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात १५ दिवसांपूर्वी धुवाँधार पडणाऱ्या पावसाचा जोर सध्या कमी झाला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत कोयनेला ६४, नवजा ८१ तर महाबळेश्वरला ७६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयनेतील साठा ८७ टीएमसीवर असून पायथा वीजगृहातून विसर्ग सुरूच आहे. तसेच जिल्ह्यातील इतर काही धरणांतूनही पाणी सोडण्यात येत आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील १५ दिवसांपूर्वी धुवाँधार पाऊस झाला. कोयना, नवजा, तापोळा, बामणोली आणि महाबळेश्वर भागात पावसाने रौद्ररुप धारण केले होते. त्यामुळे कोयना धरणासह अन्य प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली.

अवघ्या काही दिवसांत कोयना धरणातील पाणीसाठा ९१ टीएमसीपर्यंत पोहोचला. तर कोयनेतच २४ तासांत १६ टीएमसीवर पाणीसाठा वाढण्याचा विक्रमही झाला होता. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या पायथा वीजगृह आणि सहा दराजातून विसर्ग सुरू करण्यात आला.

सुरुवातीला धरणाचे सर्व सहा दरवाजे दहा फुटांवर उचलून कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आलेला. त्यामधून ५० हजार क्यूसेकवर वेगाने पाणी सोडण्यात येत होते. त्यानंतर पावसाचा जोर कमी होत गेला. तसा विसर्गही टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आला.

बुधवारी सकाळच्या सुमारास धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले. त्यामुळे दरवाजातील विसर्ग बंद झाला आहे. मात्र, पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आलेला. गुरुवारीही वीजगृहातून विसर्ग सुरुच होता.गुरुवारी सकाळी ८ च्या सुमारास कोयना धरणात ८७.३७ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर २२७९४ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. गुरूवारी सकाळपर्यंच्या २४ तासांत कोयनानगर येथे ६४ मिलीमीटर पाऊस झाला. तर यावर्षी आतापर्यंत ३३४२ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. नवजाला ८१ आणि जूनपासून आतापर्यंत ४२६१ मिलीमीटर पाऊस पडला आहे. तसेच महाबळेश्वरला सकाळपर्यंत ७६ आणि आतापर्यंत ४३४९ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे.धरणांत गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठाधोम धरणातून नदी आणि बोगद्याद्वारे मिळून ६०० क्यूसेकने विसर्ग सुरू होता. बलकवडी धरणातून १७४० तर तारळीतून १८९९ क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू होता. दरम्यान, कण्हेर, उरमोडी या धरणातील विसर्ग बंद करण्यात आलेला आहे. सध्या धोम, कण्हेर, कोयना, उरमोडी, बलकवडी आणि तारळी या धरणांत गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. 

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान