शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे कोपर्डे हवेलीतील पूल कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 14:13 IST

गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कोपर्डे हवेलीतील पुईचा ओढा भरुन वाहत आहे. यामुळे पाण्याच्या प्रवाहाने पुईचा पूल कोसळला असून वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देपावसामुळे कोपर्डे हवेलीतील पूल कोसळला वाहतुकीसाठी दुसऱ्या रस्त्याचा पर्याय स्वीकारावा लागणार

कोपर्डे हवेली : गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कोपर्डे हवेलीतील पुईचा ओढा भरुन वाहत आहे. यामुळे पाण्याच्या प्रवाहाने पुईचा पूल कोसळला असून वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे.कऱ्हाड  तालुक्यात कोपर्डे हवेली गाव आहे. येथे कृष्णा नदीलगत पांढर शिवाराकडे जाणारा पुईचा पूल आहे. या पुलावरुन नडशी, वहागाव आदी गावांकडे जाता येते. कोपर्डे हवेली, नडशी या गावांतील शेतीसह इतर वाहनांची ये-जा या पुलावरुन होत असते. वाहतुकीच्यादृष्टीने हा पूल महत्त्वाचा आहे. गेल्या पंधरा वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हा पूल तयार करण्यात आला होता.कोपर्डे हवेलीतील ५० टक्के शेतकऱ्यांच्या शिवाराची भिस्त या पुलावरील वाहतुकीवर अवलंबून आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी पावसामुळे या पुलाला छोटीशी भेग पडलेली. मात्र, बुधवारी सकाळी आठच्या सुमारास ट्रॅक्टर पुलावरुन जात असताना पुलाचा मधला भाग खचला.

दैव बलवत्तर म्हणून पुढील अनर्थ टळला. पुलाची दुरुस्ती होईपर्यंत शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी दुसऱ्या रस्त्याचा पर्याय स्वीकारावा लागणार आहे. कृष्णा नदीच्या पाण्याची फुगी या पुलापर्यंत येत असते. त्यामुळे पुईचा ओढा असे त्याला नाव पडले आहे.

कोपर्डे हवेलीतील या पुलाची दुरुस्ती लवकर होणे गरजेचे आहे. उसासह इतर वाहतूक या पुलावरुनच होत असते. पूल ढासळल्याने ही वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. ऊस गळीत हंगाम जवळ आल्याने पुलाची दुरुस्ती तातडीने होणे आवश्यक आहे. तसेच सततची होणारी वाहतूक व वापर पाहता पुलाची मजबुती वाढवणे गरजेचे आहे.- गुरूदत्त चव्हाण,शेतकरी कोपर्डे हवेली

 

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर