शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पाऊस वाढला; नवजाला ११६ मिलीमीटर नोंद 

By नितीन काळेल | Updated: July 18, 2024 18:45 IST

कोयनेत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक, पाणीसाठ्यात वाढ

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात तीन दिवसांच्या उघडझापनंतर पावसाने पुन्हा दमदार सुरूवात केली आहे. तसेच धरणक्षेत्रातही पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक ११६ मिलीमीटरची नोंद झाली. तर या पावसामुळे काेयनेत येणाऱ्या पाण्याचीही आवक वाढली आहे. त्यामुळे धरण पाणीसाठा ४४ टीएमसीवर पोहोचला आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी अशी प्रमुख धरणे आहेत. या धरणांची पाणीसाठवण क्षमता १४८ टीएमसीच्यावर आहे. या धरणावर अनेक गावांच्या पाणी तसेच सिंचन योजनाही अवलंबून आहेत. यासाठी ही धरणे महत्वाची ठरतात. तसेच याच पश्चिम भागात आणखी काही छोटी धरणे आहेत. सध्या छोटी धरणे भरु लागली आहेत. मात्र, मोठी धरणे भरण्यासाठी संततधार पावसाची आवश्यकता आहे. त्यातच आतापर्यंतच्या दीड महिन्यात पावसाची उघडझाप होत असल्याने धरणातील साठा मोठ्या प्रमाणात वाढलेला नाही.चार दिवसांपूर्वी तर पश्चिम भागातील कोयना, नवजा, कास, बामणोली, तापोळासह महाबळेश्वरमध्ये जोरदार पाऊस झालेला. त्यानंतर उघडझाप सुरू होती. मात्र, बुधवारपासून पुन्हा पाऊस वाढला आहे. तसेच धरणक्षेत्रातही पाऊस होत असल्याने साठा वाढू लागला आहे.गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ८६ मिलीमीटर पाऊस झाला. तर एक जूनपासून आतापर्यंत २ हजार ८७ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. नवजाला ११६ तर आतापर्यंत २ हजार ४५४ मिलीमीटर पाऊस पडला आहे.

महाबळेश्वरमध्ये यंदा पश्चिम भागात पर्जन्यमान कमी महाबळेश्वरमध्ये यंदा पश्चिम भागात पर्जन्यमान कमी आहे. २४ तासांत महाबळेश्वरला ७१ तर आतापर्यंत १ हजार ८७५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. कोयना धरणक्षेत्रातही बुधवारपासून पाऊस वाढला आहे. त्यामुळे आवक वाढून ११ हजार क्यूसेकवर गेली आहे. गुरूवारी सकाळी धरणात ४४.०६ टीएमसी पाणीसाठा झाला होता. २४ तासांत सुमारे एक टीएमसीने साठा वाढला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण