शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; नवजाला १३३ मिलिमीटरची नोंद, कोयनेतून पुन्हा विसर्ग

By नितीन काळेल | Updated: September 26, 2024 19:10 IST

वीर, कण्हेर अन् उरमोडीतूनही पाणी सोडले, पिकांचे नुकसान  

सातारा : जिल्ह्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असून पूर्व दुष्काळी भागात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. पश्चिमेकडेही जोरदार हजेरी असून २४ तासांत नवजाला १३३ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. त्यातच पावसामुळे धरणातही पाण्याची आवक वाढल्याने कोयनेसह, वीर, कण्हेर आणि उरमोडीतूनही पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.जिल्ह्यात चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढत चालला आहे. पूर्व भागात तर ढगफुटीसदृश्य पाऊस हाेत आहे. यामुळे ओढ्यांना नद्याचे स्वरुप आले आहे. तलावांतही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढू लागलाय. तसेच खरीप हंगामातील पिकांत पाणी साचून नुकसान होऊ लागले आहे. यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. पश्चिम भागातील सातारा, जावळी, वाई, पाटण, कऱ्हाड तालुक्यातही पावसाचे प्रमाण वाढलेले आहे.गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर नवजाला १३३ आणि महाबळेश्वर येथे ७७ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. पश्चिमेकडील या पावसामुळे प्रमुख धरणांतही पाणीसाठा वाढला आहे. कोयना धरणात तर सकाळच्या सुमारास १० हजार क्यूसेकने पाण्याची आवक होत होती. त्यामुळे सायंकाळी पायथा वीजगृहाची दोन्ही युनिट सुरू करून २ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तर सकाळच्या सुमारास धरणात १०३.६३ टीएमसी पाणीसाठा होता. ९८.४६ इतकी पाणीसाठ्याची टक्केवारी आहे.

नदीकाठावरील रहिवाशांना इशारा..सातारा-पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील वीर धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर आहे. यामुळे गुरूवारी पहाटेपासून धरणातून टप्प्याटप्प्याने पाणी विसर्ग वाढविण्यात आला. सकाळी सहाच्या सुमारास १४ हजार ७६१ क्यूसेक विसर्ग सुरू होता. सातारा तालुक्यातील कण्हेर आणि उरमोडी धरणातूनही विसर्ग सुरू झालेला आहे. यामुळे या नीरा, वेण्णा आणि उरमोडी नदीकाठावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण