शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सातारा जिल्ह्यात धरणक्षेत्रात पाऊस, कोयना नव्वदीच्या उंबरठ्यावर

By नितीन काळेल | Updated: September 19, 2023 12:15 IST

महाबळेश्वरला ५५ मिलीमीटरची नोंद; यंदा पर्जन्यमान कमीच 

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरणक्षेत्रात पाऊस सुरू झाला असून २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक ५३ मिलीमीटरची नोंद झाली. तर कोयना धरण उशिरा का असेना ९० टीएमसीच्या उंबरठ्यावर आले आहे. तर धरण भरण्यासाठी अजून १५ टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यासाठी आणखी काही दिवस पाऊस पडण्याची गरज आहे.जिल्ह्यात यावर्षी मान्सूनचा पाऊस उशिरा सुरू झाला. पण, जुलै महिन्यातच पश्चिम भागात धुवाॅंधार पाऊस पडला. त्यामुळे लवकरच कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी या प्रमुख सहा धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. अनेक धरणे ६० टक्क्यांवर भरली. पण, आॅगस्ट महिन्यात पावसाने निराशा केली. संपूर्ण महिन्यात अत्यल्प पर्जन्यमान झाले. त्यामुळे धरणे काही भरली नाहीत. आता तर सप्टेंबर महिना अर्ध्याहून अधिक संपलेला आहे. तरीही मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला नाही. पावसाची तूट कायम आहे. तरीही मागील दोन दिवसांपासून पश्चिम भागात पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे धरणांत सावकाशपणे पाणीसाठा वाढू लागला आहे.मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे २९ तर नवजाला २२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर पश्चिम भागात सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला ५३ मिलीमीटर पडला आहे. तर एक जूनपासूनचा विचार करता सर्वाधिक पाऊस नवजा येथे ५४६३ मिलीमीटर झाला आहे. यानंतर महाबळेश्वरला ५१६३ आणि सर्वात कमी कोयनानगर येथे ३८४३ मिलीमीटर पडला आहे. त्याचबरोबर धरणक्षेत्रात पाऊस पडत असल्याने कोयनेत पाण्याची आवक वाढली आहे.

आज, सकाळच्या सुमारास ६७८७ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरण पाणीसाठा ८९.३९ टीएमसी झालेला. टक्केवारीत हे प्रमाण सुमारे ८५ इतके आहे. तर धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. त्यामुळे धरण भरण्यासाठी अजून १५ टीएमसीवर पाण्याची आवश्यकता आहे. तर धरणातून होणारा पाणी विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.

गतवर्षी १०४ टीएमसीवर पाणीसाठा..गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक होते. पश्चिमेकडेही चार महिने पावसाने हजेरी लावलेली. त्यामुळे धरणेही वेळेत भरली होती. गतवर्षी १९ सप्टेंबरला कोयना धरणात १०४.६० टीएमसी पाणीसाठा होता. यंदा अजुन ९० टीएमसीचा टप्पाही पार केलेला नाही. तर गतवर्षी आतापर्यंत कोयनेला ४४३४ मिलीमीटर पाऊस पडला होता. तर नवजाला ५३९० आणि महाबळेश्वरला ५७९० मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरणMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान