शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस-पाण्यासाठी समदं गाव वेशीबाहेर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:17 IST

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : वरूणराजाने गावावर कृपादृष्टी ठेवावी, गाव सुजलाम-सुफलाम व्हावं अन् गावकºयांची एकी अखंड टिकून राहावी, हे साकडं देवाकडे घालण्यासाठी सर्व गावकरी गावाबाहेर आले. सहा तास सहाशे ग्रामस्थ देहभान हरपून भक्तीरसात तल्लीन झाले. एवढेच नव्हे धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर सर्वांनी वनभोजनाचा आनंदही घेतला. फलटण तालुक्यातील कापशी गावात ...

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : वरूणराजाने गावावर कृपादृष्टी ठेवावी, गाव सुजलाम-सुफलाम व्हावं अन् गावकºयांची एकी अखंड टिकून राहावी, हे साकडं देवाकडे घालण्यासाठी सर्व गावकरी गावाबाहेर आले. सहा तास सहाशे ग्रामस्थ देहभान हरपून भक्तीरसात तल्लीन झाले. एवढेच नव्हे धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर सर्वांनी वनभोजनाचा आनंदही घेतला. फलटण तालुक्यातील कापशी गावात ही प्रथा अनेक वर्षांपासून सुरू असून तीन वर्षांतून एकदाच श्रावण महिन्यात या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.कापशी गावची लोकसंख्या दीड हजाराच्या घरात असून, अनेक ग्रामस्थ नोकरी व व्यवसायनिमित्त बाहेरगावी राहतात. सर्व गावकरी तीन वर्षांतून एकदा श्रावण महिन्यात देवाला पावसाचे साकडे घालण्यासाठी गावाच्या सीमेवर एकत्र येतात.नियोजनानुसार रविवारी (दि. १३) सकाळी ११ वाजता ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथाची पालखी वाजत-गाजत गावातून मार्गस्थ झाली. सर्व गावकरी पालखीच्या मागून गावच्या सिमेवर असलेल्या अंबाबाई मंदिरात एकत्र आले. लहान मुले, युवक व महिलांसह सुमारे सहाशे गावकरी या सोहळ्यात सहभागी झाले. मंदिरात एकत्र आल्यानंतर मानकरी रावसाहेब बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक कार्यक्रम पार पडले. यानंतर ‘पाऊस पडू दे.. शेती फुलू दे, गाव सुजलाम-सुफलाम होऊ दे, गावची एकी अखंड राहू दे’ असे साकडे गावकºयांनी देवाला घातले.हा विधी पूर्ण झाल्यानंतर ग्रामस्थांनी एकत्रितपणे वनभोजन केले. जागरण व गोंधळाचा कार्यक्रम व महाआरती झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजता ग्रामदैवताच्या पालखीसह गावकरी पुुन्हा गावाकडे मार्गस्थ झाले.वनभोजनासाठी धपाटी अन् उसळया सोहळ्यात महिलांसह घरातील प्रत्येक सदस्याने सहभाग घेतला. घरातून निघताना प्रत्येकाने सोबत जेवण घेतले होते. पूर्वी जेव्हा हा कार्यक्रम होत असे, तेव्हा गावकरी आपल्या सोबत धपाटी अन् कडधान्याची उसळ आणत असे. अनेक महिलांनी आपल्यासोबत धपाटी अन् उसळ आणून या प्रथेचे दर्शन घडविले.तिसरे पर्व तीन वर्षांनीतीन वर्षांतून एकदा श्रावण महिन्यात गावकरी सीमेवरील मंदिरात एकत्र येऊन देवाकडे सुख-समृद्धीसाठी साकडे घालतात. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही प्रथा मध्यंतरीच्या काळात बंद पडली. मात्र, ग्रामस्थांनी २०१४ पासून ती पुन्हा सुरू केली. यंदा या प्रथेचे ५त ि दुसरे पर्व होते. आता २०२० साली हा सोहळा होणार आहे.सोहळ्यासाठी लोकवर्गणीकापशी गावात तीन वर्षांतून एकदा या सोहळ्याचे आयोजन केले जाते. या सोहळ्यासाठी येणारा खर्च लोकवर्गणीतून केला जातो. गावकरी आपापल्या परिने देणगी देतात. वनभोजनाच्या काही दिवस अगोदर देवाच्या पालखीला निरा स्नान घातले जाते. यासाठी येणार खर्च त्र्यंबक बोबडे यांनी केला.