शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

संपादित होणाऱ्या जमिनीचा रेल्वेचा शेतकऱ्यांना पाचपट मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 14:38 IST

Railway Karad Satara : पार्ले, बाबरमाची, सयापूर, यशवंतनगर, शिरवडे या कऱ्हाड तालुक्यातील शेतकऱ्यांना पुणे मिरज लोंढा रेल्वे दुहेरीरणामध्ये संपादित होणाऱ्या जमिनिचा बाजारभावाच्या पाचपट बागायती जमिनीप्रमाने मोबदला देण्यात आला आहे. कऱ्हाडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते पार्ले येथील शेतकऱ्यांना मोबदल्याच्या धनादेशाचे नुकतेच वितरण करण्यात आले.

ठळक मुद्देसंपादित होणाऱ्या जमिनीचा रेल्वेचा शेतकऱ्यांना पाचपट मोबदलाचांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी व्यक्त केला आनंद

कऱ्हाड : पार्ले, बाबरमाची, सयापूर, यशवंतनगर, शिरवडे या कऱ्हाड तालुक्यातील शेतकऱ्यांना पुणे मिरज लोंढा रेल्वे दुहेरीकरणामध्ये संपादित होणाऱ्या जमिनीचा बाजारभावाच्या पाचपट बागायती जमिनीप्रमाणे मोबदला देण्यात आला आहे. कऱ्हाडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते पार्ले येथील शेतकऱ्यांना मोबदल्याच्या धनादेशाचे नुकतेच वितरण करण्यात आले.यावेळी रेल्वे आंदोलनाचे शेतकरी नेते सचिन नलवडे, प्रकल्प बाधित शेतकरी दिनकर नलवडे, भीकू नलवडे, तुकाराम नलवडे, भीमराव पाटील, रामचंद्र जाधव, संजय नलवडे, तानाजी जाधव, अशोक नलवडे, तानाजी नलवडे, शिवाजी नलवडे, विनोद नलवडे, संतोष नलवडे, सनी नलवडे, सचिन पाटिल उपस्थित होते.गेल्या तीन वर्ष्यापासून शेतकऱ्यांचा रेल्वे प्रशासनाविरोधात लढा सुरु होता. शेतकऱ्यांना मोबदला न देता रेल्वे विभागाने विविध ठिकाणी कामे सुरु केली होती. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये रेल्वेच्या हद्दीचे खांब उभे केले होते.

शेतकऱ्यांची जमीन आमचीच असल्याचा दावा रेल्वे प्रशासन करत होते. यावेळी शेतकऱ्यांना सोबत घेवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे त्यावेळचे जिल्ह्याध्यक्ष सचिन नलवडे यांना सोबत घेवून शेतकऱ्यांनी मोठा लढा उभा केला. रेल्वेची विना मोबदला सुरु असलेली कामे सचिन नलवडे यांनी बंद केली होती.

त्यानंतर तत्कालीन खासदार उदयनराजे भोसले, जिल्ह्याधिकारी श्वेता सिंघल, प्रांत हिम्मत खराडे, भुसंपादन शाखेचे दिनकर ठोंबरे व रेल्वे अधिकारी यांची शेतकऱ्यांसोबत बैठक होवून शेतकऱ्यांच्या जमीनी सातबाऱ्याप्रमाणे मोजन्याचे ठरले .

त्यानुसार कऱ्हाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी करण्यात आली. मोजणी मध्ये रेल्वेच्या प्रस्तावातील जमिनीच्या क्षेत्रफळा पेक्षा जास्त जमीन रेल्वेसाठी संपादित होत असल्याचे निदर्शनास आले.कऱ्हाड तालुक्यातील गावातील सर्व शेतकऱ्यांना नुकतेच वाढीव क्षेत्रासह बाग़ायती जमिनीप्रमाणे बाजारभावाच्या पाचपट मोबदला मिळला आहे. जमिनीला पाच लाख, दीड लाख रुपये गुंठा प्रमाणे तर बाधित होणाऱ्या फळ झाडाना पुढील पिक गृहीत धरून मोबदला मिळाला आहे. घर, शेड, विहीर यालाही शासन निर्णया नुसार चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

टॅग्स :railwayरेल्वेKaradकराडSatara areaसातारा परिसरFarmerशेतकरी