सातारा : शहर व शाहूपुरी पोलिसांनी दोन ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून तिघांवर गुन्हा दाखल केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, राधिका चित्रपटगृहाशेजारील टपरीच्या आडोशाला मटका घेतल्याप्रकरणी एकावर शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक श्रीधर जवळकर (रा. प्रतापगंज पेठ, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहेत. त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा ३०५ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, शिवराज तिकाटणे परिसरात टपरीच्या आडोशाला सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी छापा टाकून एकावर गुन्हा दाखल केला. त्याच्याकडून पोलिसांनी रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा सुमारे ४०० रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी अशोक रामचंद्र पालकर (रा. काशीळ, ता. सातारा) व यासीन शेख (रा. शनिवार पेठ) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.